Join us

फ्लॉप नाही आता फक्ट हीटच, खिलाडी कुमारचे बॅक टू बॅक 7 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 4:54 PM

1 / 9
सध्या अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. खिलाडी कुमार अक्षयसाठी 2024 हे वर्ष खास नव्हते. परंतु 2025 मध्ये मात्र तो धुमाकूळ घालणार आहे. कारण, अक्षयचे एक दोन नाही तर तब्बल सात चित्रपट बॅक टू बॅक पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.
2 / 9
अक्षय कुमार हा 2025 मध्ये 4 सिक्वेल, 2 ओरिजिनल आणि एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ते सिनेमे कोणते आहेत, हे आपण जाणून घेऊया.
3 / 9
अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टी, अर्शद वारसी आणि राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत.
4 / 9
अक्षय कुमारचा 'Sky Force' हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. अक्षय कुमारचा 2025 मधील हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
5 / 9
'शंकरा' या चित्रपटात अक्षयसोब आर माधवन आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. हा एक बायोपिक असल्याचं बोललं जात आहे.
6 / 9
अक्षय कुमारच्या आणखी एक हिट फ्रँचायझी 'हाऊसफुल 5' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. याआधी हाऊसफुल (Housefull) या विनोदी चित्रपटाचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस आलेत. हाऊसफुल-1, हाऊसफुल-2, हाऊसफुल-3 आणि हाऊसफुल-4 या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
7 / 9
'जॉली एलएलबी 3'चे शूटिंगही जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार एकत्र दिसणार आहेत. 'जॉली एलएलबी'च्या पहिल्या भागात अभिनेता अर्शद वारसीने काम केलं होतं. तर दुसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. हे दोन्ही सिनेमे खूप गाजले आणि आता 'जॉली एलएलबी 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
8 / 9
अक्षय कुमार प्रियदर्शनसोबत 'भूत बंगला' या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. हे दोघेही शेवटचे 2010 मध्ये 'खट्टा मीठा'मध्ये एकत्र आले होते. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हॉरर आणि कॉमेडीने भरलेला हा चित्रपट असणार आहे.
9 / 9
नुकतेच परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी एकत्र स्पॉट झाले होते. पुढील वर्षी हे तिघेही 'हेरी फेरी 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. फरहाद सामजी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 'हेरा फेरी'चा पहिला भाग २००० मध्ये रिलीज झाला होता तर 'फिर हेरा फेरी' २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता.
टॅग्स :अक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड