"माझ्या सख्या बहिणीसमोर ती पानी कम", सावत्र भावाकडून आलियाची पूजा भटसोबत तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:30 IST
1 / 8आलिया भट ही बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री. गंगूबाई काठियावाडी, राझी, कलंक, ब्रह्मास्त्र, जिगरा अशा सिनेमांमधून तिने दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. 2 / 8आलिया ही बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे. पण, आलियाबाबत तिचा सावत्र भाऊ राहुल भटने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. 3 / 8राहुल भटने आलियाची तुलना त्याची सख्खी बहीण पूजा भटशी केली आहे. पूजासमोर आलिया काहीच नाही, असं त्याने म्हटलं आहे. 4 / 8राहुलने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत आलियाचं कौतुक करत ती करिअरसोबतच संसारही सांभाळत असल्याचं म्हटलं. एक आई असण्याबरोबरच ती करिअरमध्येही यशस्वी असल्याचं राहुल म्हणाला. 5 / 8पण, आलिया भट कुटुंबाची परंपरा पुढे नेत असल्याच्या मतावर त्याने दुमत व्यक्त केलं. 'माझ्या मते ती माझ्या बहिणीच्या अर्ध टॅलेंटही तिच्यात नाही', असं तो म्हणाला. 6 / 8'तिच्याकडे टॅलेंट नाही, ती चांगली दिसत नाही आणि सेक्सीही नाही. माझ्या सख्या बहिणीसमोर ती पाणी कम आहे. पण, हे माझं वैयक्तिक मत आहे', असंही तो म्हणाला. 7 / 8राहुल भट हा महेश भट आणि त्यांच्या पहिल्या पत्नी किरण भट यांचा मुलगा आहे. किरण यांच्यापासून महेश यांना पूजा भट ही मुलगीदेखील आहे. 8 / 8तर सोनिया राजदान या महेश भट यांच्या दुसरी पत्नी आहेत. त्यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.