‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:12 PM1 / 8एस.एस. राजमौलींचा बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झालाये आणि सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आलिया भट्ट, अजय देवगन, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा राजमौलींचा आणखी एक मास्टरपीस असल्याचं म्हटलं जातंय.2 / 8या चित्रपटाच्या बजेटबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. अगदी एका रात्रीच्या शूटींगचा खर्चच 75 लाख होता. 3 / 8अगदी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या एका एन्ट्री सीनवर किती खर्च व्हावा तर 25 कोटींचा. होय. कलाकारांनाही या सिनेमासाठी तगडी फी दिली गेली.4 / 8 या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. दोघांनीही चित्रपटासाठी तगडी फी वसूल केली आहे. रिपोर्टनुसार, रामचरण याने 45 कोटी मानधन घेतलं.5 / 8ज्युनिअर एनटीआर यानेही रामचरण इतकीच म्हणजे 45 कोटी फी घेतली. चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने कोमाराम भीम हे पात्र साकारलं आहे.6 / 8चित्रपटात आलिया भट ही सुद्धा सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण या 20 मिनिटांच्या रोलसाठी आलियाने म्हणे 9 कोटी रुपए फी घेतल्याची चर्चा आहे.7 / 8अजयच्या फीचा आकडा वाचून तर तुमचे डोळे पांढरे होतील. होय, रिपोर्टनुसार, अजयने या चित्रपटासाठी 7 दिवस शूटींग केलं आणि या 7 दिवसांसाठी त्यानं 35 कोटी रुपए मानधन घेतलं.8 / 8दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी या चित्रपटासाठी फी घेतलेली नाही तर या चित्रपटाच्या नफ्यातील वाटा ते घेणार आहेत. होय, आरआरआरच्या नफ्यात त्यांची 30 टक्के भागीदारी असल्याचं कळतंय. आणखी वाचा Subscribe to Notifications