Join us

आलियाला देशात ‘हा’ हक्कच नाही...! रणबीरनं मनावर घेतलं तर चुटकीसरशी सुटू शकते समस्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:33 PM

1 / 9
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस. आज 15 मार्चला आलिया 29 वर्षांची झाली. 2012 साली ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
2 / 9
आज आलियाला सगळे ओळखतात. पण याच आलियाला आपल्या देशात मतदानाचा हक्क नाहीये. होय, आलिया भारतात मतदान करू शकत नाही. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे.
3 / 9
दिग्दर्शक महेश भटची मुलगी आलिया एकार्थाने विदेशी आहे. होय, आलियाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. आलियाची आजी (आईची आई) जर्मन आणि आजोबा (आईचे वडील) काश्मिरी पंडित होते.
4 / 9
आलियाच्या जन्मावेळी तिची आई सोनी राजदान ब्रिटनमध्ये आपल्या आईबाबांकडे गेली. तिथेच आलियाचा जन्म झाला. त्यामुळे ती ब्रिटीश नागरिक बनली. तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे.
5 / 9
आलिया शिवाय तिची आई सोनी राजदान ही सुद्धा ब्रिटीश नागरिक आहे. कागदोपत्री आलिया विदेशी नागरिक असल्यामुळे भारतात तिला मतदानाचा हक्क नाही.
6 / 9
अर्थात भविष्यात तिला मतदानाचा हक्क मिळू शकतो. कसा? तर रणबीर कपूरच्या मदतीनं. होय, आलियाने रणबीरसोबत लग्न केलं तर तिला भारतीय असण्याचे हक्क मिळतील.
7 / 9
आलियाचा जन्म 15 मार्च 1993 राजी झाला. तिला शाहीन नावाची लहान बहिण आहे. पूजा भट व राहुल भट ही तिची सावत्र भावंडं.
8 / 9
आलिया आणि रणबीर कपूर मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच आलिया भट्ट आणि रणवीर कपूर लग्न करणार असल्याचीही माहिती आहे
9 / 9
11 वर्षांची असल्यापासून रणबीरवर तिचा क्रश आहे. आलियाने रणबीरला ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या सेटवर पाहिलं होतं. तेव्हा तो संजय लीला भन्साळींसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. तेव्हाच तो मला आवडला होता, असं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूड