कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती आलिया की रणबीर कपूर?, जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 12:34 PM1 / 12Alia Bhatt and Ranbir Kapoor : कपूर कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. होय, आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूर ( Ranbir Kapoor)आईबाबा झाले आहेत. आलियाने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 12बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही गोड बातमी ऐकून चाहतेही क्रेझी झाले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)3 / 12आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 12यासगळ्यात आता चर्चा होतेय ते दोघांच्या नेटवर्थची. जाणून घेऊया दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे ते..(फोटो इन्स्टाग्राम)5 / 12आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 12बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये आलियाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आतापर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)7 / 12रणबीरदेखील लोकप्रिय अभिनेता असून तो असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं म्हटलं जातं. रणबीरने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)8 / 12सूत्रांच्या माहितीनुसार, २०२१ पर्यंत आलियाकडे १६२ कोटी रुपये संपत्ती होती. आलिया प्रत्येक महिन्याला ६० लाखांची कमाई करते.(फोटो इन्स्टाग्राम)9 / 12एका चित्रपटासाठी आलिया ८- १० कोटी रुपये मानधन घेते. तसंच जाहिराती, ब्रँड प्रमोशनमधूनही ती पैसे कमवते.(फोटो इन्स्टाग्राम)10 / 12रणबीर कपूरची २०२१ पर्यंतची संपत्ती ३३० कोटी रुपये होती. तो एका चित्रपटासाठी ७-८ कोटी रुपये मानधन घेतो.(फोटो इन्स्टाग्राम)11 / 12रणबीर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड इंडोर्समेंटमधून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करतो.(फोटो इन्स्टाग्राम)12 / 12रणबीर आणि आलियामध्ये रणबीर जास्त श्रीमंत आहे. तसंच त्याच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारचं कलेक्शनही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications