Ranbir-Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रेडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:45 PM1 / 10आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. होय, लग्नाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी 14 ते 17 एप्रिल यादरम्यान हे कपल लग्न करतंय, हे नक्की.2 / 10कपूर वा भट कुटुंबाने अद्याप लग्नाची अधिकृत तारीख जाहिर केलेली नाही. पण आजपासून लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. मेहंदी फंक्शनने विधींना सुरूवात झाली. यानिमित्त कपूर कुटुंब व अनेक सेलिब्रिटी प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सामील झालेत.3 / 10आज प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी अख्खं कपूर कुटुंब एकत्र जमलं. रणबीर कपूरची आई नीतू कपूर आपली नात, आणि मुलगी रिद्धिमासोबत मुलाच्या घरी पोहोचली. या फोटोमध्ये त्या पोपटी रंगाच्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये दिसत आहेत. 4 / 10पापाराझी सतत नीतू कपूर यांना लग्नाबद्दल विचारत होते. परंतु नीतू मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून होत्या. आज नीतू गाडीतून मीडियासमोर हात जोडून अभिवादन करताना दिसून आल्या.5 / 10करिश्मा कपूरही यावेळी दिसली. ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये ती चुलत भावाच्या मेहंदी सेलिब्रेशनमध्ये सामील झाली.6 / 10करिना कपूर व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. व्हाईट लहेंग्यामध्ये तिने जबरदस्त एन्ट्री घेतली.7 / 10 करण जोहर, अयान मुखर्जी हे रणबीर व आलियाचे सर्वात जवळचे मित्र यांनीही आलिया व रणबीरच्या मेहंदी फंक्शनला हजेरी लावली.8 / 10रणबीरची आत्त्या रीमा जैनही लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रणबीरच्या घरी पोहोचल्या.9 / 10रणबीरचा कझिन अरमान जैन हाही यावेळी दिसला. तो सुद्धा रणबीर व आलियाच्या आनंदात सहभागी झाला. रणबीर व आलियाच्या लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळतेय. ठिकठिकाणी 200 बाऊंसर्स तैनात करण्यात आले आहेत.10 / 10आलियाचे वडील महेश भट यांनी लेकीच्या मेहंदी फंक्शनमध्ये अशी झक्कास एन्ट्री घेतली. यावेळी आलियाची सावत्र बहिण पूजा भट खूप आनंदी दिसत होती. आणखी वाचा Subscribe to Notifications