Join us

मनिष मल्होत्राच्या पार्टीत आलियाने रिपीट केला लग्नातील मेहेंदी लूक, ट्रेडिशनल लूकमध्ये पोहोचले सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:12 AM

1 / 7
बॉलिवूडमध्ये अनेक पार्ट्या होत असतात. कालच लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही पार्टी आयोजित केली होती. मनीष मल्होत्राच्या या दिवाळी पार्टीत अख्खं बॉलिवूड आलं होतं.
2 / 7
या पार्टीत आलिया भटच्या (Alia Bhatt) लूकने लक्ष वेधलं. आलियाने तिच्या लग्नातील मेहंदीच्या दिवशी घातलेला आऊटफिट रिपीट केला. त्यामुळे आलियाचं खूप कौतुक होत आहे.
3 / 7
गुलाबी रंगाच्या या घागऱ्यात आलिया कमालीची सुंदर दिसत आहे. २०२२ साली तिने रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधली. मेहंदीच्या दिवशी तिने हाच घागरा परिधान केला होता.
4 / 7
पार्टीत श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) सिल्व्हर रंगाची साडी नेसून आली होती. स्लीव्हलेस शिमरी ब्लाऊज आणि आकर्षक ज्वेलरी अशा लूकमध्ये तिने सर्वांनाच आकर्षित केलं.
5 / 7
एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) तर नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. रेखाच्या साड्यांच्या कलेक्शनचं तर नेहमीच कौतुक होतं. या पार्टीत रेखा या केशरी रंगाची साडी नेसून आल्या. मनीष मल्होत्रासोबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
6 / 7
लाडकं कपल कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राही (Siddharth Malhotra)हातात हात घालून पोहोचले. कियाराने फिशकट डिझाईन असलेला गोल्डन लेहेंगा परिधान केला होता.
7 / 7
याशिवाय बॉलिवूडमधील इतरही सुंदरींनी हजेरी लावत पार्टीची शोभा वाढवली. अनेकांनी यावेळी साडीलाच प्राधान्य दिलं. प्रत्येकीच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतलं होतं.6
टॅग्स :मनीष मल्होत्राआलिया भटश्रद्धा कपूररेखाबॉलिवूड