Alia Bhatt's Weight Loss Journey : लेकीच्या जन्मानंतर आलिया भटनं कसं घटवलं वजन ?, अभिनेत्रीनं केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:37 PM1 / 11बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (alia Bhatt) ही सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे. 2 / 11आलिया भटने लेक राहाला सी सेक्शनच्या मदतीने जन्म दिला. त्यानंतर आलियाचे खूप वजन वाढले होते. आता अचानक आलियाला पुन्हा एकदा फिट पाहून चाहते थक्क झाले.3 / 11अनेकांनी असे म्हटले की आलियाने सर्जरी करत वजन कमी केले आहे. अशा सगळ्या कारणांमुळे आलिया पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने याबाबत खुलासा केला आहे.4 / 11आलिया भटने नुकतेच व्हॉग इंडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने कशा प्रकारे वजन कमी केले. इतकंच काय तर तिने कोणत्याही सर्जरीच्या मदतीने हे केले नसल्याचे सांगितले.5 / 11यासोबतच आलिया सध्या राहाला ब्रेस्टफिडींग करत असल्यामुळे तिची अक्कल दाढही काढू शकत नाही. त्यासोबतच ती अॅनेस्थेशिया घेऊ शकत नाही असे म्हटले. 6 / 11तर अनेकांना वाटते की मी माझे वजन कोणत्या अननॅच्यूरल पद्धतीने कमी केले आहे पण सत्य हे आहे की मी माझी अक्कल दाढ सध्या काढू देखील शकत नाही. कारण मी राहाला ब्रेस्टफिडींग करते आणि मी अॅनेस्थिशिया घेऊ शकत नाही. 7 / 11तर वजन कमी करण्यासाठी ती आठवड्यातील ६ दिवस वर्कआऊट आणि डाएटचे काटेकोरपणे पालन करते. 8 / 11आलियाने खुलासा केला की तिची सासू म्हणूजेच नीतू कपूर यांनी तिच्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. जे तिने सहा आठवडे खाल्ले. लोकांना कळायला हवे की प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे याचा अर्थ तुम्ही खूप खाता असे नाही. त्याचे कारण म्हणजे तुमच्यासोबत जी व्यक्ती मोठी होत आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. 9 / 11पण तुमचे जे वजन आहे ते आपल्या बिएमआय प्रमाणे योग्य असायला हवे. तुम्ही एखाद्या प्रोफेश्नल व्यक्तीशी यावर चर्चा करायला हवी, पण तुम्ही काही प्रमाणात वजन घेत वर्कआऊट करण योग्य आहे. 10 / 11प्रेग्नेंसीच्या १२ आठवड्यानंतर हेवी वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी असा सल्ला तिच्या डॉक्टरांनी दिल्याचे आलियाने पुढे सांगितले. 11 / 11प्रेग्नेंसीआधी जितके वर्क-आऊट किंवा मग जितके वेट ती घ्यायची तिथवर पोहोचायला तिला अजून वेळ आहे. आलिया ही साधारण रुटिन फॉलो करते रोज १५ मिनिटं वॉक आणि ब्रिदिंग एक्सर्साईज करते. आणखी वाचा Subscribe to Notifications