Allu Arjun ते Jnr NTR पर्यंत या स्टार्सनी लग्नावर पाण्यासारखा पैसा केला खर्च, साऊथची सर्वात महागडी लग्ने! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 3:59 PM1 / 10भारतात लग्न मोठ्या जल्लोषात एखाद्या उत्सवाप्रमाणे केले जातात. भारतीय लग्नांमध्ये रिती-रिवाजांपासून ते खाण्या-पिण्यावर इतका खर्च केला जातो की, खर्च वाढतोच. आपले फिल्म स्टार्सही आपल्या लग्नांवर मोठा खर्च करतात. या यादीत आम्ही तुम्हाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी त्यांच्या लग्नात किती खर्च केला होता हे सांगणार आहोत.2 / 10काजल अग्रवाल आणि गौतम किचलू - अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचं लग्न शाही थाटात झालं. लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रिपोर्ट्सनुसार, काजलने या लग्नात ५ लाख रूपये किंमतीचा लहंगा घातला होता. इतकंच नाही तर अभिनेत्रीने फोटोग्राफर्सना वेडिंग शूटसाठी १.५ लाख रूपये रोज इतकं मानधन दिलं होतं. यावरून लग्नाला किती खर्च लागला असेल याचाही अंदाज येतो.3 / 10अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याची गर्लफ्रेन्ड स्नेहा रेड्डीसोबत शाही थाटात लग्न केलं होतं. या दोघांचं लग्न फिल्मी विश्वातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानलं जातं. रिपोर्टनुसार, 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या लग्नात १०० कोटी रूपये खर्च झाले होते.4 / 10राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज - अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाजचं लग्न कोरोना काळात झालं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नात केवळ ३० पाहुणेच होते. त्यांच्या लग्नात भलेही जास्त पाहुणे नसतील, पण हे लग्न सर्वात महागड्या लग्नापैकी एक मानलं जातं. राणा दग्गुबातीच्या लग्नात डेकोरेशनपासून ते डिझायनर कपडे आणि ज्वेलरीवर कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले होते.5 / 10राम चरण आणि उपासना कमिनेनी - साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण याने त्याची गर्लफ्रेन्ड कमिनेनीसोबत २०१२ मध्ये लग्न केलं होतं. त्याच्या भारतीय सिनेमा विश्वातील अनेक मोठे लोक आले होते. राम चरणच्या लग्नात कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आला होता. त्यामुळेच हे लग्न सर्वात महागड्या लग्नांमध्ये मोजलं जातं.6 / 10धनुष आणि ऐश्वर्या - सुपरस्टार धनुष हा रजनीकांतचा जावई होता. धनुषने त्याची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं होतं. २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. पण नुकताच त्यांनी घटस्फोट घेतला. हे लग्न तमिळ सिने विश्वातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानलं जातं. या लग्नात अनेक मोठे कलाकार आले होते.7 / 10सूर्या शिवकुमार आणि ज्योतिका - तमिळ अभिनेता सूर्या शिवकुमार आणि ज्योतिका यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे. सूर्या आणि ज्योतिकाच्या लग्नात मोठे स्टार्स आणि राजकीय लोक आले होते. जयललितापासून ते रजनीकांतपर्यंत पाहुणे आले होते. रिपोर्टनुसार, अभिनेत्री ज्योतिकाने लग्नात ३ लाख रूपयांची लाल रंगाची साडी नेसली होती. सोबतच तिने हिऱ्याचे दागिने घातले होते.8 / 10जूनियर एनटीआर आणि लक्ष्मी - सुपरस्टार ज्युनिअर एनटीएरने २०११ मध्ये लक्ष्मीसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्यूनिअर एनटीआरने लग्नाच्या मंडपावर १८ कोटी रूपये खर्च केले होते. असंही म्हटलं जातं की, या लग्नासाठी १०० कोटी रूपये खर्च झाले होते. इतकंच नाही तर त्याने त्याच्या लग्नाची एक पत्रिका ३ हजार रूपयांची बनवली होती.9 / 10स्नेहा आणि प्रसन्ना - अभिनेत्री स्नेहा आणि प्रसन्नाने २०१२ मध्ये शाही थाटात लग्न केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या लग्नात सोन्याने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. ज्याची किंमत साधारण २ लाख रूपये होती. तर अभिनेत्रीने एकूण ६ लाख रूपयांचे दागिने घातले होते.10 / 10ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी - विक्रम रेड्डी हा हैद्राबादमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. त्यांचा मुलगा राजीव रेड्डी याने ब्राम्हणी सोबत लग्न केलं. साऊथच्या या लग्नात पाण्यातसारखा पैसा खर्च केला होता. रिपोर्ट्समद्ये दावा करण्यात आला आहे की, ब्राम्हणी रेड्डी आणि राजीव रेड्डीच्या या लग्नाचा खर्च ५०० कोटी रूपये आला होता. हे साऊथच्या सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications