बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांची बहीणदेखील आहे अभिनेत्री; अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:59 IST
1 / 9अभिनेता आलोक नाथ हे नाव बॉलिवूडच्या कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक चित्रपटांमध्ये प्रेमळ वडिलांची भूमिका साकारुन ते लोकप्रिय झाले आहेत.2 / 9एक आदर्श, प्रेमळ वडील म्हणून त्यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आज ते बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी या नावाने ओळखले जातात.3 / 9आलोक नाथ यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सारेच जण जाणतात. पण, आज त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.4 / 9आलोक नाथ यांची बहीणदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर छोट्या पडद्यावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.5 / 9आलोक नाथ यांच्या बहिणीचं नाव विनीता मलिक आहे. विनिता लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनीदेखील अनेक मालिकांमध्ये प्रेमळ आई, सासू, आजी अशा भूमिका साकारल्या आहेत.6 / 9काल भैरव रहस्य, दिल मिल गए, छोटी सरदारनी, देस में निकला होगा चांद, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कुमकुम: प्यारा सा बंधन यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.7 / 9विनीता सोशल मीडियावरही कमालीच्या सक्रीय आहेत. त्या अनेकदा त्यांचे सेटवरील फोटो शेअर करत असतात.8 / 9विनीता यांनी आजपर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.9 / 9आलोक नाथ यांनी १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. बुनियाद या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा काम केलं.