Amitabh Bachchan Birthday: म्हणून तब्बल २२ चित्रपटांत अमिताभ बच्चन यांचं नाव होतं विजय, त्यामागे आहे मोठं गुपित By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:55 PM 2021-10-11T12:55:58+5:30 2021-10-11T12:59:03+5:30
Amitabh Bachchan Birthday: Bollywoodचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार Amitabh Bachchan यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याबाबतची एक खास माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जवळपास २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव विजय असे होते. मात्र यामागचं कारण फारच थोड्या लोकांना माहिती आहे. ते कारण पुढीलप्रमाणे आहे.
बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. या वयातही ते चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याबाबतची एक खास माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जवळपास २२ चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव विजय असे होते. मात्र यामागचं कारण फारच थोड्या लोकांना माहिती आहे. ते कारण पुढीलप्रमाणे आहे.
त्यानंतर त्यांना प्रकाश मेहरा यांच्या जंजीर चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. हा चित्रपट अनेक अभिनेत्यांनी रिजेक्ट केला होता. प्रकाश मेहरा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जंजीर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, अमिताभ बच्चन खूप नर्व्हस राहत असत. शॉट घेतल्यानंतर ते एकट्याने कोका-कोला प्यायचे.
अमिताभ बच्चन यांनी जंजीर चित्रपटासाठी आपले १००टक्के योगदान दिले. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या कॅरॅक्टरचे नाव विजय असे होते. तसेच या चित्रपटात जया भादुरी ह्या मुख्य भूमिकेत होत्या.
अमिताभ बच्चन यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका भावना सोमय्या यांनी एकदा सांगितले होते की, आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक प्रथा आहे. ज्या नावाने एकाद्या स्टारचा चित्रपट हिट होतो. तेच नाव पुढच्या चित्रपटांमध्ये त्याच्या कॅरॅक्टरला दिले जाते. मी हीच बाब जावेद अख्तर यांना विचारली. तेव्हा त्यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन हे प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवायचे. कदाचित म्हणूनच बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचं नाव हे विजय ठेवलं असावं.
अमिताभ बच्चन यांना विजय या नावामुळे मिळालेल्या यशामुळेच सुमारे २२ चित्रपटांमध्ये त्यांचं नाव विजय ठेवलं गेलं. यामध्ये जंजीर, रोटी कपडा और मकान, हेरा-फेरी, त्रिशूल, डॉन, द ग्रेट गॅम्बलर, काला पत्थर, दो और दो पांच, दोस्ताना, शान, शक्ती, आखिरी रास्ता, अकेला, आंखे, रण, शहेंशाह, अग्निपथ अशा सुमारे २२ चित्रपटात त्यांचं नाव विजय ठेवलं गेलं.
१९६९ मध्ये त्यांनी आपली फिल्मी कारकीर्द मृणाल सेन यांच्या बंगाली चित्रपटासाठी देऊन सुरू केली होती. त्यांना सर्वप्रथम सुनील दत्त यांनी रेश्मा और शेरा चित्रपटासाठी साईन केलं होतं. हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला होता.
अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत २०५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये १२ चित्रपटात त्यांनी डबल रोल केला होता. तर महान चित्रपटात त्यांनी ट्रिपल रोल केला होता.
अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यापूर्वी कोलकातामध्ये रेडिओ अनाउन्सर आमि एका शिपिंग कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केले होते. त्यादरम्यान त्यांना ८०० रुपये पगार मिळत होता. १९६८ मध्ये नोकरी सोडल्यानंतर ते मुंबईत आले.
आज वयाच्या ७९ व्या वर्षीही अमिताभ बच्चन चित्रपट क्षेत्रात सक्रीय आहेत. तसेच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहेत.