Join us

आतून असा दिसतो अमिताभ बच्चन यांचा 'जलसा', पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 3:49 PM

1 / 7
Amitabh Bachchan Jalsa Inside Pics: महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईत जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्स, असे अनेक बंगले आहेत. पण, ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह जलसा बंगल्यात राहतात. दर रविवारी बिग बी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी बंगल्याबाहेर येतात.
2 / 7
आपल्या लाडक्या महानायकाची एक झलक पाहण्यासाठी या बंगल्याबाहेर शेकडो चाहते जमतात. हा बंगला बाहेरुन जितका आलिशान दिसतो, तितकाच आतून सुंदरआहे. याच बंगल्याचे काही फोटोज आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
3 / 7
अमिताभ बच्चन यांचा हा बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाही. अमिताभ यांचे मुंबईतील जुहू येथे जलसा, प्रतीक्षा आणि जनक असे तीन बंगले आहेत. या तिन्ही बंगल्यांमधील 'जलसा' अमिताभ यांच्या अगदी जवळ आहे. जलसाबाहेर एक मोठी बाग आहे, जिथे ते बराच वेळ घालवतात.
4 / 7
जलसामध्ये अतिशय सुंदर फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हा बंगला अमिताभ यांना त्यांच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटात काम करण्यासाठी दिला होता. नंतर अमिताभ यांनी हा विकत घेतला.
5 / 7
घराच्या आतील भिंती वेगवेगळ्या थीमने सजवल्या आहेत. अनेक भिंतींवर फक्त फोटोफ्रेम्स आहेत, ज्या अतिशय आकर्षक दिसतात. या फोटोफ्रेम्सने घराचे इंटीरियर सुंदर दिसते. बंगल्यातील त्यांची बेडरुम, किचन, वॉशरुम, हे सगळेच जागतिक दर्जाचे बनवलेले आहे.
6 / 7
अमिताभ यांनी प्रथम जलसापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असलेल्या प्रतीक्षा नावाचा बंगला खरेदी केला होता. अमिताभ बच्चन 70 च्या दशकात प्रतीक्षामध्ये राहायला गेले, नंतर त्यांनी जलसा विकत घेतला.
7 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार जलसाची किंमत 100 ते 120 कोटींच्या दरम्यान आहे. अमिताभ बच्चन यांनी नंतर ऑफिसच्या कामासाठी जनकला विकत घेतले. याशिवाय अमिताभ यांचा वत्स नावाचा आणखी एक बंगलादेखील आहे.
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडमुंबई