anniversary special: अशी सुरु झाली होती अमिताभ-जया यांची लव्हस्टोरी, या अटीमुळे घाईघाईत उरकले होते लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 1:39 PM1 / 8आज अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाचा 47वा वाढदिवस आहे. .या निमित्ताने फोटो शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचे सीक्रेट सांगितले आहे.2 / 8अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला 47 वर्षे झाले आहेत. अशात त्यांनी लग्नाच्या अल्बममधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.3 / 8यासोबतच अमिताभ बच्चन यांनी लग्नाचे एक सीक्रेटदेखील शेअर केले आहे.4 / 8अमिताभ व जया बच्चन यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.5 / 81973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.6 / 8‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते. जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली.7 / 8तत्पूर्वी वडील हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. 8 / 8जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय म्हणाले. अमिताभ वडिलांचे शब्द टाळू शकत नव्हते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मग काय घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत. आणखी वाचा Subscribe to Notifications