Join us

अधुरी एक कहाणी...! Rekha यांना फार काळ घेता आला नाही वैवाहिक जीवनाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 3:39 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे प्रोफेशनल लाइफ इतकंच त्यांचं खासगी आयुष्यदेखील चर्चेत आले आहे.
2 / 8
विशेष करून, प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत त्यांनी बरेच चढउतार पाहिले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अफेयर्सच्या चर्चांपासून मुकेश अग्रवाल यांच्यासोबतचे लग्न आणि इतकंच नाही तर त्यांचं नाव अक्षय कुमारसोबतही जोडले गेले होते. एकंदरीत रेखा यांचं जीवन वादग्रस्त होते.
3 / 8
यासिर उस्मान यांचे पुस्तक 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी'मधून त्यांच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी प्रसिद्धीझोतात आल्या. या पुस्तकात रेखा आणि मुकेश अग्रवाल यांनी लग्न केले तेव्हाचा देखील उल्लेख आहे.
4 / 8
४ मार्च, १९९० रोजी मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. ते अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी खूप उत्सुक होते आणि काहीही झाले तरी त्यांना त्यांच्यासोबत लग्न करायचे होते. त्यावेळी त्या दोघांच्या कुटुंबातील व्यक्ती मुंबईत उपस्थित नव्हते. असेही असताना त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
5 / 8
त्याच संध्याकाळी रेखा वधूसारखी नटून थटून मुंबईतील मुक्तेश्वर देवळात गेले होते. पण तिथे इतकी गर्दी होती की त्या दोघांना घरी परतावे लागले. शेवटी रात्री साडे दहाला दोघे पुन्हा मंदिरात गेले आणि झोपलेल्या पुजारीला उठवून घातले आणि त्यांचे लग्न लावून द्यायला सांगितले.
6 / 8
रेखा त्या काळी केवळ एक प्रसिद्ध अभिनेत्री नव्हत्या. तर अनेकदा त्या मंदिरात जायच्या, त्यामुळे त्यांना पाहून पुजारी खूप आश्चर्यचकित झाले होते, पण रात्री उशिरा त्यांच्या लग्नाचे विधी पार पडले आणि रेखा आणि मुकेश यांनी गाठ बांधली.
7 / 8
३७ वर्षीय मुकेश यांनी ३५ वर्षीय रेखा यांना आपला साथीदार म्हणून निवडले होते. पण लग्नाच्या ७ महिन्यांनंतर मुकेश यांनी गळफास लावून आत्महत्या केली आणि रेखा आयुष्याच्या या टप्प्यावर एकटी पडली.
8 / 8
यानंतर रेखाने पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाही. ती एकटीच जीवन जगत आहे.
टॅग्स :रेखा