Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 4:07 PM1 / 10बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ही अभिनेत्री अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली. तिने आता चंकी पांडे यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.2 / 10अनन्या पांडे वडील चंकी पांडेसोबत 'वी आर युवा'च्या 'बी अ पॅरेंट यार' शोमध्ये पोहोचली होती. जिथे दोघांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यातील अनेक किस्से सर्वांसोबत शेअर केले. यावेळी अनन्याने तिच्या वडिलांना इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा सल्ला दिला.3 / 10जेव्हा अनन्याने वडिलांना शोमध्ये विचारले, ती चांगली अभिनेत्री आहे का?, तेव्हा ते गंमतीने म्हणाले, 'घरी की पडद्यावर?' यासोबतच चित्रपट साइन करण्यापूर्वी अनन्याच्या स्क्रिप्ट काळजीपूर्वक वाचण्याच्या सवयीचीही त्यांनी खिल्ली उडवली.4 / 10वडिलांच्या बोलण्याने अनन्या चिडते आणि म्हणते, 'लायगरनंतर, तुम्हाला मला कोणत्याही चित्रपटासाठी सल्ला देण्याची परवानगी नाही.' 5 / 10चित्रपटामध्ये अभिनेत्री विजय देवरकोंडासोबत दिसली होती. अनन्या शोमध्ये वडिलांना इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याचा सल्ला देताना दिसली.6 / 10अनन्या म्हणते, तुम्ही तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं पाहिजे, कारण अनेकवेळा तुम्हाला कोणतीही पोस्ट विचार न करता लाईक करता, त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो.7 / 10या शोमध्ये अनन्या नेपोटिझमबद्दलही मोकळेपणाने बोलली. ती म्हणाली होती की, 'फक्त माझ्या वडिलांच्या नावाने मला बॉलिवूडमध्ये ओळखलं जावं असं मला कधीच वाटत नाही.'8 / 10चंकी पांडे हे लवकरच अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. अनन्या 'कॉल मी बे' मध्ये दिसली होती.9 / 10अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications