Join us

अनिल कपूरच्या लेकीला पळून जाऊन करायचं होतं लग्न, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:51 AM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर अखेर लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड करण बूलानीसोबत तिने लग्नगाठ बांधली.
2 / 10
रिया व करण 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर 14 ऑगस्टच्या मुहूर्ताला दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
3 / 10
अतिशय साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. आता लग्नानंतर काय तर रिया कपूरने एक मजेशीर खुलासा केला आहे. होय, मला करणशी पळून जाऊन लग्न करायचे होते, असे तिने म्हटले आहे.
4 / 10
केवळ इतकेच नाही तर मला माझ्या लिव्हिंग रूममध्येच लग्न करायचे होते, असेही तिने म्हटले आहे.
5 / 10
पळून जाऊन लग्न करण्याची रियाची इच्छा काही पूर्ण झाली नाही. पण हो, लिव्हिंग रूममध्ये लग्न करण्याची तिची इच्छा मात्र पूर्ण झाली.
6 / 10
यासाठी तिने सर्वांचे आभार मानले आहेत. मला माझ्या लिविंग रूममध्ये लग्न करायचे होते. हे सर्व शक्य करण्यासाठी सर्वांचे आभार, असे रियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
7 / 10
रिया आणि करणची पहिली भेट ‘आयशा’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अनेक वर्ष दोघांनीही आपले रिलेशनशिप लपवून ठेवले.
8 / 10
सोनम कपूरच्या लग्नानंतर पहिल्यांदा रिया व करणच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती.
9 / 10
करण हा क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आणि नेटफ्लिक्स सीरिजचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे .
10 / 10
आयशा आणि वेक अप सिड या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे. तर रिया एक फॅशन डिझाईनर आहे. निर्माती अशीही तिची ओळख आहे.
टॅग्स :अनिल कपूर