Join us

बाबो! अनिल कपूरला सोडून पत्नी सुनीता एकटीच गेली होती हनीमूनला, एका प्रँक कॉलमुळे बदलले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:46 AM

1 / 11
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर करत पत्नी सुनीता कपूरला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनिता यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला दोघांची लव्हस्टोरी सांगणार आहोत. (Photo Instagram)
2 / 11
अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले. (Photo Instagram)
3 / 11
एका मुलाखती दरम्यान अनिलने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही बोललो आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्यावर भाळलो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. (Photo Instagram)
4 / 11
ती आमची पहिली भेट होती. पण सुनीतामध्ये असे काही होते की, मी तिच्याकडे आकर्षित झालो. आम्ही मित्र बनलो. त्यावेळी माझे ब्रेकअप झाले होते, ही गोष्टही मी तिच्याशी शेअर केली होती. (Photo Instagram)
5 / 11
यानंतर आम्ही कधी एकमेकांना डेट करू लागलो, हेच कळले नाही. आमच्यात बायॅफ्रेन्ड - गर्लफ्रेन्डसारखे काहीही नव्हते. पण प्रेम होते. (Photo Instagram)
6 / 11
ती स्वतंत्र कुटुंबातील होती. तिचे पापा बँकर होते. ती स्वत: मॉडेलिंग करत होती आणि मी बेकार होतो. मी चेंबूरला राहायचो आणि ती नेपियनसी रोडवर.(Photo Instagram)
7 / 11
मी तिला भेटायला बसने जायचो. पण ती मला टॅक्सी घ्यायला सांगायची. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर, जस्ट कम ना... आय विल मॅनेज... हे तिचे उत्तर ठरलेले असायचे. (Photo Instagram)
8 / 11
लग्नानंतर मी किचनमध्ये जाणार नाही आणि जेवण बनवणार नाही, हे लग्नाआधीच सुनीताने स्पष्ट केले होते. त्यामुळे हिच्यासोबत लग्न करायचे तर मला काहीतरी बनावे लागेल, हे मला समजून चुकले होते. मी त्याकाळात प्रचंड स्ट्रगल केले. अर्थात सुनीताकडून माझ्यावर कधीच कुठला दबाव नव्हता. (Photo Instagram)
9 / 11
‘मेरी जंग’नंतर आता मी सुनीतासोबत लग्न करू शकतो, असे मला वाटले. आता मी घर घेऊ शकत होतो, नोकर ठेऊ शकत होतो. (Photo Instagram)
10 / 11
मी सुनीताला फोन केला आणि उद्या आपण लग्न करतोय, असे तिला सांगितले. दुसऱ्याच दिवशी केवळ 10 लोकांच्या साक्षीने आम्ही लग्न केले. (Photo Instagram)
11 / 11
लग्नानंतर तीन दिवसांनी मी शूटवर निघून गेलो आणि सुनीता एकटी हनीमूनसाठी गेली. ती मला खूप चांगल्याप्रकारे ओळखते. ती एक परफेक्ट आईच नाही तर परफेक्ट पत्नी सुद्धा आहे. (Photo Instagram)
टॅग्स :अनिल कपूर