Join us

तृप्ती डिमरीच्या यशामागचं 'श्रेय'स! मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिलेला 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 4:40 PM

1 / 10
संदीप वांगा रेड्डीच्या 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन देऊन अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. सिनेमातील तिच्या या सीन्सची आणि बोल्डनेसची प्रचंड चर्चा रंगली आहे.
2 / 10
तृप्तीच्या चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस भर पडत आहे. 'ॲनिमल'मधील भाभी २ आता चाहत्यांचा नॅशनल क्रश बनली आहे.
3 / 10
'ॲनिमल' आधीही तृप्तीने अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. 'कला' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. पण, 'ॲनिमल'मुळे तृप्तीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
4 / 10
रातोरात स्टार झालेल्या तृप्तीला बॉलिवूडमध्ये करिअर करणं सोपं नव्हतं. अभिनयासाठी घर सोडून मुंबईत आल्याचं तृप्तीने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
5 / 10
तृप्ती डिमरीच्या बॉलिवूडमधील करिअरला आईवडिलांचा विरोध होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काम मिळेपर्यंत अनेकदा तृप्तीकडे पैसेही नसायचे. अशावेळी मित्रमैत्रिणी आणि बहिणींनी मदत केल्याचं तृप्ती म्हणाली होती.
6 / 10
'ॲनिमल'आधी तृप्ती 'कला', 'बुलबुल', 'लैला मजनू', 'मॉम', 'पोस्टर बॉइज' या सिनेमात झळकली होती. पण, 'ॲनिमल'मुळे तृप्तीचं नशीब उजळलं.
7 / 10
'बुलबुल' सिनेमात तृप्तीची भूमिका लक्षवेधी ठरली होती. तर 'लैला मजनू'मध्ये तिला पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली.
8 / 10
सुरुवातीला अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर तृप्तीला बॉलिवूड सिनेमात पहिला ब्रेक मिळाला होता. मराठमोळ्या दिग्दर्शकाने तृप्तीला त्याच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायची संधी दिली होती.
9 / 10
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'पोस्टर बॉइज' मधून तृप्ती डिमरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने रिया हे पात्र साकारलं होतं.
10 / 10
सनी देओल, बॉबी देओल, सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन श्रेयस तळपदेने केलं होतं. तृप्तीचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. तर श्रेयसचा दिग्दर्शक म्हणून पहिला हिंदी सिनेमा होता.
टॅग्स :तृप्ती डिमरीश्रेयस तळपदेसिनेमा