बॉयफ्रेंडच्या निधनानंतर आलं डिप्रेशन, ५२ वर्षांच्या अभिनेत्यावर जडला जीव; अंकिता कोनवारची स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 2:57 PM1 / 8जेव्हा आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या दु:खातून बाहेर पडणं खूप अवघड असतं. अशावेळी आजूबाजूच्या लोकांची मिळणारी साथ खूप महत्वाची असते. दु:खातून बाहेर पडण्यासाठी आपलं कोणीतरी सोबत असणं महत्वाचं असतं.2 / 8मनोरंजनसृष्टीतील फिट कलाकारांपैकी एक म्हणजे मिलिंद सोमण (Milind Soman). एकेकाळी मिलिंद सोमण मॉडेलिंग क्षेत्रात आघाडीवर होता. सिनेमात मात्र त्याची जादू फारशी चालली नाही. मिलिंदने वयाच्या ५२ व्या वर्षी २६ वर्षांच्या तरुणीशी लग्न केलं तेव्हा तो परत चर्चेत आला.3 / 8मिलिंद सोमणचा कोणत्या तरुणीवर जीव जडला हे बघण्याची उत्सुकता अनेकांना होती. तरुणी म्हणजे अंकिता कोनवार(Ankita Konwar). २०१८ मध्ये दोघांनी स्पेनमध्ये लग्न केलं. अंकिता मूळची आसामची आहे. आज अंकिता ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.4 / 8अंकिता आणि मिलिंद एकमेकांना एका नाईटक्लबमध्ये भेटले. तिथेच त्यांची ओळख झाली. पुढे मैत्री झाली. मिलिंद सोमणला भेटण्यापूर्वी अंकिताचं दुसऱ्यासोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं. 5 / 8बॉयफ्रेंडच्या निधनानंतर अंकिता खूप एकटी पडली होती. ती प्रचंड दु:खात होती.हादरली होती. अशाच वेळी तिची भेट मिलिंदसोबत झाली होती. मिलिंद सोमण पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. मात्र बॉयफ्रेंडच्या निधनामुळे ती दु:खात असल्याने तिने मिलिंद सोमणला नकार दिला होता.6 / 8मिलिंद सोमणने मात्र तिला एकच गोष्ट सांगितली. तो म्हणाला की,'जेव्हापासून माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे तेव्हापासून तुझा आनंद, तुझं दु:ख हे माझं झालंय. सध्या तुझ्यावर जे दु:खाचं ओझं आहे तेही माझं. घाबरु नको आपण मिळून सगळ्याला तोंड देऊ.' 7 / 8मिलिंद सोमणने अंकिताला डिप्रेशनमधून बाहेर काढलं.नंतर दोघांनी संसार थाटला. मिलिंद प्रमाणेच अंकिताही फिटनेस फ्रीक आहे. तिलाही व्यायामाची आवड आहे. त्यामुळे दोघांचं सूत जुळलं.8 / 8मिलिंद आणि अंकिताचे व्हॅकेशनचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सतत ते कुठे ना कुठे फिरायला जातात. तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications