अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 8:29 AM1 / 8सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलियाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 2 / 8आलियाने २३ व्या वर्षी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी सात फेरे घेत लग्नगाठ बांधली आहे. ११ डिसेंबरला आलिया आणि शेनचा शाही विवाहसोहळा पार पडला. 3 / 8कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 4 / 8त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. लग्नासाठी आलियाने लेहेंगा परिधान केला होता. तर शेनने शेरवानी घातली होती. 5 / 8आलिया-शेनच्या लग्नातील खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नववधू आलियाला पाहताच शेन भावुक झाला होता. 6 / 8आलिया-शेनच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर रिसेप्शनही ठेवण्यात आलं होतं. 7 / 8आलियाने रिसेप्शनला लाल रंगाची साडी नेसली होती. तर शेनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. 8 / 8आलियाला चाहत्यांनी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications