मराठमोळ्या अभिनेत्रीवर हिंदी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झालेला बलात्काराचा प्रयत्न, सही घेण्यासाठी रुममध्ये आला अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 4:20 PM1 / 9अभिनय आणि सौंदर्याने ८०-९०च्या दशकात प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना जोगळेकर. सध्या सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या अर्चना आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 2 / 9मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर अर्चना यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचं नशीब आजमावलं. 'संसार' या गाजलेल्या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 3 / 9या सिनेमात त्यांनी अनुपम खेर यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. संसार सिनेमामुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. 4 / 9पण, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. १९९७ साली अर्चना 'उड़िया' सिनेमाच्या शूटिंगसाठी ओडिसाला गेल्या होत्या. 5 / 9त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३० नोव्हेंबर १९९७ च्या रात्री ही घटना घडली. 6 / 9अर्चना ओडिसामधील सरकारी पंथ निवासमध्ये थांबल्या होत्या. सिनेमाच्या शूटिंगनंतर अर्चना त्यांच्या रुममध्ये गेल्या. तेव्हा त्यांच्या पाठोपाठ एक व्यक्ती त्यांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी आली होती. 7 / 9जेव्हा अर्चना यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्या व्यक्तीने त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्चना यांनी आरडाओरडा केल्यामुळे हॉटेलमधील इतर व्यक्तींनी त्यांची सुटका केली. त्या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. 8 / 9पण, या घटनेनंतर त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणंच पसंत केलं. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. 9 / 9लग्नानंतर त्या परदेशात स्थायिक झाल्या आहेत. न्यू जर्सी येथे त्यांनी स्वत:ची डान्स अकॅडमीही सुरू केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications