Join us

'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 7:28 PM

1 / 9
वयाच्या ६० व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi)यांनी दुसऱ्यांदा संसार थाटला.
2 / 9
आशिष यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं असून सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा रंगली आहे.
3 / 9
आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी विद्यार्थी (Rajoshi Vidyarthi) यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
4 / 9
अलिकडेच राजोशी विद्यार्थी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आशिष यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं.
5 / 9
आम्ही ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती आणि ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे.त्यामुळे आम्हाला याविषयी कुठेही वाच्यता करायची नव्हती.
6 / 9
मागील २२ वर्ष माझ्या आयुष्यातील सुंदर काळ होता. तुम्ही आशिषला विचारलं तर तोदेखील हेच सांगेल. तो एक उत्तम जीवनसाथी होता. आम्ही बरीच वर्ष एकत्र प्रवास केला. आमच्या खूप गोष्टींमध्ये साम्य आहे.तर काही गोष्टींमध्ये भिन्न विचारही होते पण कधी त्यावरुन वाद झाला नाही, असं राजोशी म्हणाली.
7 / 9
पुढे ती म्हणते, आम्हाला अर्थ हा गोड मुलगादेखील आहे. त्याच्या पालनपोषणात आशिषचाही तितकाच हातभार आहे. लोकांना वाटतं की आईच सगळं बाळासाठी करते. पण, वडिलांची भूमिका खूप मोठी असते. मी एक कलाकार आहे आणि मला जाणीव झाली की काही गोष्टी मला अडवू शकत नाहीत. त्याच वेळी कळलं की आमच्या दोघांच्या भविष्याच्या वाटाही वेगळ्या आहेत. त्यामुळे नात्यात अडकून पडण्यापेक्षा आम्ही दोघांनी आमचा आनंद ज्यात आहे त्याची निवड केली.
8 / 9
दरम्यान, आशिषने मला कधीच फसवलं नाही. त्याचा पाठिंबा होता म्हणूनच मी विभक्त होण्याचा निर्णय घेऊ शकले. कोणत्याही वादविवादशिवाय आम्ही वेगळे झालो आणि आमच्यातील मैत्री कायम आहे. त्यांनी लग्न केलं याचा मला आनंद आहे. मला दुसरं लग्न करायचं नाहीये. पण, प्रत्येकाला दुसरी संधी मिळाली पाहिजे. असं त्यांनी सांगितलं.
9 / 9
राजोशी एक अभिनेत्री, गायिका आणि आरजे आहे. तिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच इमली, सुहानी सी एक लडकी या मालिकांमध्येही काम केलं आहे.
टॅग्स :आशिष विद्यार्थीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन