Join us

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:55 AM

1 / 9
आशिष विद्यार्थ्यी यांनी साठीत दुसरं लग्न केल्यामुळे, यावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. अनेकांना असे वाटते की आशिष विद्यार्थीने त्याची पहिली पत्नी राजोशी बरुआ हिची फसवणूक केली, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. लोकांना असेही वाटते की, आशिष विद्यार्थ्यी यांना काहीही करुन रूपाली बुरुआशी लग्न करायचे होते. आशिष विद्यार्थी यांनी पहिली पत्नी ​​राजोशी विद्यार्थी हिच्या खुलाशानंतर आपलं दुसरे लग्न, घटस्फोट आणि नातेसंबंधांबद्दल खुलासा केला आहे.
2 / 9
आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न करण्यामागील कारण सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
3 / 9
या व्हिडिओमध्ये ते म्हणतायेत, '२२ वर्षांपूर्वी राजोशी आणि मी भेटलो आणि लग्न केलं. आम्हाला 22 वर्षांचा अर्थ नावाचा मुलगा आहे. गेल्या काही वर्षांत, पीलू आणि मी भविष्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहोत.'
4 / 9
'आम्ही मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला पण लक्षात आले की एक तडजोड करावी लागते आहे. जी आम्हाला आमच्या आनंदापासून दूर घेऊन जातेय. प्रत्येकाला आनंद हवा असतो. आम्ही एकत्र बसलो आणि एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
5 / 9
अलिकडेच आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आशिष यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं.
6 / 9
आम्ही ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती आणि ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे.त्यामुळे आम्हाला याविषयी कुठेही वाच्यता करायची नव्हती. मागील २२ वर्ष माझ्या आयुष्यातील सुंदर काळ होता. तुम्ही आशिषला विचारलं तर तोदेखील हेच सांगेल. तो एक उत्तम जीवनसाथी होता. आम्ही बरीच वर्ष एकत्र प्रवास केला. आमच्या खूप गोष्टींमध्ये साम्य आहे.तर काही गोष्टींमध्ये भिन्न विचारही होते पण कधी त्यावरुन वाद झाला नाही, असं राजोशी म्हणाल्या.
7 / 9
पुढे त्या म्हणल्या, आम्हाला अर्थ हा गोड मुलगादेखील आहे. त्याच्या पालनपोषणात आशिषचाही तितकाच हातभार आहे. लोकांना वाटतं की आईच सगळं बाळासाठी करते. पण, वडिलांची भूमिका खूप मोठी असते. मी एक कलाकार आहे आणि मला जाणीव झाली की काही गोष्टी मला अडवू शकत नाहीत. त्याच वेळी कळलं की आमच्या दोघांच्या भविष्याच्या वाटाही वेगळ्या आहेत. त्यामुळे नात्यात अडकून पडण्यापेक्षा आम्ही दोघांनी आमचा आनंद ज्यात आहे त्याची निवड केली.
8 / 9
दरम्यान, आशिषने मला कधीच फसवलं नाही. त्याचा पाठिंबा होता म्हणूनच मी विभक्त होण्याचा निर्णय घेऊ शकले. कोणत्याही वादविवादशिवाय आम्ही वेगळे झालो आणि आमच्यातील मैत्री कायम आहे. त्यांनी लग्न केलं याचा मला आनंद आहे. मला दुसरं लग्न करायचं नाहीये. पण, प्रत्येकाला दुसरी संधी मिळाली पाहिजे. असं त्यांनी सांगितलं.
9 / 9
आशिष विद्यार्थी यांचा जन्म हा केरळमधील असून त्यांच्या आई या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होत्या. त्यांनी कॉलेज जीवनात असताना रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. त्यांनी सरदार या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. द्रोहकाल या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
टॅग्स :आशिष विद्यार्थीघटस्फोट