Join us

'या' मुस्लिम नेत्याची सून आहे आयशा टाकिया, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् इस्लाम धर्म स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:20 IST

1 / 10
Ayesha Takia: 'वाँटेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेली आयशा टाकिया एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची.
2 / 10
तिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केले आहे. लग्नानंतर आयशा बॉलिवूडमधून गायब झाली.
3 / 10
काही दिवसांपुर्वी आयशा तिच्या चेहऱ्यात झालेल्या बदलांमुळे चर्चेत आली होती. तिला ओळखणंही कठीण झालं होतं. यावरुन नेटकऱ्यांनी खूपच ट्रोल केलं होतं.
4 / 10
आता पुन्हा एकदा आयशा चर्चेत आली आहे. तुम्हाला माहितेय आयशा ही एका मुस्लिम नेत्याची सून आहे.
5 / 10
बॉलिवूडमध्ये करियर यशाच्या शिखरावर असताना आयेशा लग्न केलं होतं. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला.
6 / 10
आयशाचे सासरे राजकारणी तर आयशाचा नवरा हा बिझनेसमन आहे.
7 / 10
आयशाचे सासरे हे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे ( Ayesha Takia Is Daughter In Law Of Samajwadi Party Mla Abu Azmi ) आहेत. अभिनेत्रीनं २००९ मध्ये अबू आझमी यांचा लेक फरहान आझमीसोबत लग्न केलं होतं.
8 / 10
आयशा आणि फरहान यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव मिखाइल आझमी असं आहे.
9 / 10
आयशाच्या करियरची सुरूवात २००४ साली 'टारझन द वंडर कार' चित्रपटातून झाली होती. त्यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. आता आयशा बॉलिवूड पासून दूर आहे.
10 / 10
आयशाच्या सासरे अबू आझमी यांना नुकतंच संपूर्ण अधिवेशापर्यंत निलंबन (Abu Azmi Who Suspended From Assembly Amid Aurangzeb Remark Row) करण्यात आले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबचे गोडवे गायल्यानंतर विधिमंडळात गदारोळ उडाला. आता अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
टॅग्स :आयशा टाकियाअबू आझमीसमाजवादी पार्टी