Ayesha Takia : चार वर्ष डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी...सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 12:10 PM1 / 9सलमान खानच्या 'वॉंटेड' सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री आएशा टाकिया बऱ्याच वर्षांपासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.2 / 9वॉंटेड, टार्झन द वंडर कार,दिल मांगे मोर, डोर अशा काही सिनेमांमधून आएशाने अभिनयाचा जलवा दाखवला. तिच्या अभिनयावर आणि रुपावर चाहते घायाळ झाले होते. मात्र ती अचानक गायब झाली.3 / 9याचं कारण म्हणजे आएशाने २००९ मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबु आजमी यांचा मुलगा फरहान आजमीशी निकाह केला. तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती.4 / 9फरहान आजमी एक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत हॉटेलही आहे. असं म्हणतात तेव्हा आएशा अनेकदा त्याला हॉटेलवर भेटायची. मात्र तिने नातं लपवून ठेवलं होतं.5 / 9२००५ सालापासूनच दोघांमध्ये भेटीगाठी व्हायच्या. मात्र तेव्हा दोघांनी याचा सार्वजनिक स्वीकार केला नाही. तरी दोघे डेटिंग करत आहेत हे स्पष्ट होते.6 / 9२००९ मध्ये तिने फरहान सोबत निकाह करत इस्लाम धर्माचाही स्वीकार केला. आपले चमकते करिअर सोडून तिने निकाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.7 / 9आज त्यांच्या लग्नाला १४ वर्ष झाली आहेत. भले ही ती मायानगरीपासून दूर आहे तरी ती सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असते.8 / 9२०१३ साली तिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव मिकेल असे ठेवण्यात आले. आपल्या क्युट मुलासोबतही तिने फोटो शेअर केले आहेत. 9 / 9काही वर्षांपूर्वी आएशाने सर्जरी केली. यानंतर तिला ओळखणेही कठीण झाले होते. सोशल मीडियावर तिली चांगलेच ट्रोल करण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications