गुलाबाची कळी कशी हळदीने माखली...! पाहा, राणा दग्गुबाती व मिहिका बजाजच्या हळदीचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 11:39 AM1 / 11‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका निभावणारा अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत.2 / 11उद्या 08 ऑगस्ट रोजी राणा व मिहिका बजाज लग्नगाठ बांधणार आहेत.तूर्तास राणा व मिहिकाच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.3 / 11या सेरेमनीत राणा व मिहिका दोघेही धम्माल मस्ती करताना दिसले. त्यांचा रोमॅन्टिक अंदाजही पाहायला मिळाला.4 / 11मिहिका या फोटोंमध्ये सिल्व्हर-यॅलो आउटफिटमध्ये आहे. तर राणा ट्रॅडिशनल अवतारात आहे.5 / 11मिहिकाने हळदीसाठी काही वेगळ्या प्रकारचे दागिने निवडले. त्या दागिण्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.6 / 11मिहिका बजाजचे विविध पोजमधील फोटो यावेळी व्हायरल होत आहेत. 7 / 11 कोरोना काळात त्यांच्या लग्नासाठी फक्त 30 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 8 / 11कोरोनामुळे या लग्नासाठी केवळ घरातील सदस्यांना निमंत्रण दिले आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील जवळच्या मित्रांना देखील निमंत्रण नाही.तेलुगू आणि मारवाडीअशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. 9 / 11या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार आहे. खुद्द राणने ही माहिती दिली आहे 10 / 11मे महिन्यात राणा दग्गूबातीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत साखरपुड्याबाबत माहिती दिली होती. 11 / 11मिहिका बजाज असून ती इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications