PHOTO : राम्याच्या ‘त्या’ लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ; इतक्या कोटींची आहे मालकीण By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:20 PM1 / 14बाहुबली आणि बाहुबली 2 या चित्रपटांत शिवगामी देवीची लक्षवेधी भूमिका साकारणा-या अभिनेत्री राम्या क्रिष्णन हिचा आज वाढदिवस.2 / 1415 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नई येथे तिचा जन्म झाला झाला. उण्यापु-या 13 वर्षांच्या असताना तिने चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. 3 / 14राम्याने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये 200 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. पण बाहुबलीने तिला जी ओळख दिली, ती अन्य कुठल्याही चित्रपटाने नाही.4 / 14 आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस राम्याने दक्षिणात्य चित्रपटात काम केले. दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लोकप्रियता मिळविल्यानंतर राम्याला बॉलिवूड खुणावू लागले. 5 / 141988 मध्ये तिला पहिला हिंदी चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘दयावान’. माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यात लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट सुपरहिट झाला. पण राम्याला या चित्रपटाचा फार लाभ झाला नाही. कारण यात ती डान्सरच्या भूमिकेत दिसली.6 / 14बॉलिवूडमध्ये राम्याला खास यश मिळाले नाही. पण बोल्ड अंदाजामुळे ती कायम चर्चेत राहिली़ ‘परंपरा’ या चित्रपटात स्वत:पेक्षा 24 वर्षे मोठ्या विनोद खन्ना यांच्यासोबत लिपलॉक सीन करून तिने खळबळ निर्माण केली होती.7 / 14राम्याने अनिल कपूरसोबतही बोल्ड सीन्स दिले. 1995 मध्ये प्रदर्शित ‘त्रिमूर्ती’ या सिनेमात तिला नकारात्मक भूमिका मिळाली होती. यात तिने अनिल कपूरसोबत अनेक बोल्ड सीन्सही दिले होते. मात्र हे सीन्स ऐनवेळी चित्रपटातून गाळण्यात आलेत. यामुळे या चित्रपटात राम्याचे नाव कुठेही आले नाही. मात्र या चित्रपटासाठी दिलेल्या बोल्ड सीन्सचे फोटो लीक झाल्यामुळे राम्या प्रचंड चर्चेत आली होती.8 / 141998 मध्ये प्रदर्शित वजूद या सिनेमात राम्याने नाना पाटेकर यांच्यासोबत किसींग सीन दिला होता.9 / 14बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री अशीच राम्याची इमेज बनली होती. पण बॉलिवूडने तिला म्हणावे तसे यश दिले नाही. त्यामुळे तिने पुन्हा साऊथकडे मोर्चा वळवला.10 / 1412 जून 2003 मध्ये तेलगु दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्याशी तिने संसार थाटला.11 / 14बाहुबलीसाठी 2.5 कोटी फी घेणारी राम्याकडे एकून 37 कोटींची प्रॉपर्टी आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंज एस ३५० ही शानदार कार आहे. ज्याची किंमत तब्बल १ कोटी २० लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, २०१२ साली राम्या हिच्या बंगल्यातून तिच्या कामवालीने तब्बल १० लाख रुपयांच्या सोन्याची चोरी केली होती.12 / 14 2015मध्ये आलेला बाहुबली चित्रपट हा तिच्या कारकिदीर्तील मैलाचा दगड ठरला. यातील तिने साकारलेल्या शिवगामीच्या भूमिकेला भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळाली . या चित्रपटामध्ये तिने केलेल्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत.13 / 14राम्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा एखादा लेखक किंवा दिग्दर्शक मला सिनेमाची कथा ऐकवतो तेव्हा खरं तर मला खूप झोप येते. पण जेव्हा मला दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी बाहुबली सिनेमाची कथा सांगितली तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: काटे उभे राहिले. एवढंच नव्हे तर मी पूर्ण सिनेमाची कथा ही जवळजवळ दोन तास टक लावून ऐकत होते. 14 / 14 सुपर डिलक्स या सिनेमात राम्याने एका विशेष सीनसाठी दोन दिवसात तब्बल ३७ वेळा रिटेक घेतले होते. याशिवाय ती तामिळ सिनेमात अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications