बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 6:23 PM1 / 11Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सिद्दिकी यांच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आले होते. आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून ही हत्या केल्याचं उघड झालं आहे.2 / 11आरोपींकडून एकूण ६ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत सिद्दिकी यांनी आपले प्राण गमावले होते. बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.3 / 11पण, तुम्हाला माहितेय का बाबा सिद्दिकी नाही तर इतरही काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्यांनी आपला जीव गमावला. 4 / 11बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गुलशन कुमार यांचे (Gulshan Kumar) नाव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आहे. टी-सीरीजचे संस्थापक आणि भक्तिगीतांसाठी लोकप्रिय असलेले गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. त्यांच्यावर मंदिरासमोर 16 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत 3 हल्लेखोरांचा समावेश होता.5 / 11गुलशन कुमार हे संगीत विश्वातील एक मोठं नाव होतं. अंडरवर्ल्डला खंडणी न दिल्यामुळं त्यांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती. गुलशन कुमार की विकेट गिरने वाली है असा एक फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तत्काळ हालचाली केल्या गेल्या परंतु त्याआधीच त्यांची हत्या करण्यात आली. 6 / 11 प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala killed by gangsters) 29 मे 2022 मध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धूच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला होता. 7 / 11सिद्धू मूसेवाला आणि त्याच्या साथीदारांवर 30 राऊंड गोळीबार करण्यात आले होते. मुसेवालावर हल्ला झाला तेव्हा तो दोन साथीदारांसह कारमध्ये होता. त्यानंतर काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी सिद्धू मूसेवालावर गोळीबार सुरू केला.8 / 11प्रसिद्ध पंजाबी गायक, गीतकार, संगीतकार अमरसिंग चमकिला (Amar Singh Chamkila)यांचीदेखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 9 / 118 मार्च 1988 रोजी अमरसिंग, अमरजोत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसामपूरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. दुपारी दोन वाजता ते आपल्या गाडीतून बाहेर पडले, तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीने त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. च्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलींवर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.10 / 11दरम्यान, असेही काही कलाकार आहेत, ज्यांच्यावर हल्ला झाला, पण ते वाचले. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते राकेश रोशन यांच्यावर २१ जानेवारी २००० रोजी संध्याकाळी सांताक्रूझ वेस्ट टिळक रोड येथील त्यांच्या ऑफिसबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या चकमकीत त्यांच्या डाव्या हाताला आणि छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोर घटनास्थळावरून लगेचच पळून गेले होते. गोळी त्याच्या हृदयाच्या स्पर्श करून त्यांच्या छातीच्या हाडाजवळ अडकली होती. पण, उपचारानंतर त्यांचे प्राण वाचले. 11 / 11मुंबईत सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाला होता. त्याची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. एवढेच नाही तर बिश्नोई गँगने सांगितले की, 'हरणाची शिकार केल्याप्रकरणी आम्ही सलमान खानला माफ करणार नाही'. दरम्यान आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाहीये. आणखी वाचा Subscribe to Notifications