Join us  

'बागबान' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? फरहान अख्तरसोबत होतं अफेअर; नंतर कुठे गायब झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 1:35 PM

1 / 9
अमिताभ बच्चन यांचा 'बागबान'(Baghban) सिनेमा आठवत असेल. कौटुंबिक नात्यांवर आधारित असलेला हा सिनेमा आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमातली अभिनेत्री सुमन रंगनाथन (Suman Ranganathan) आठवतेय? सध्या कुठे आहे ही अभिनेत्री
2 / 9
सुमन रंगनाथनने सिनेमात अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या सूनेची भूमिका साकारली होती. ९० च्या दशकात सुमन रंगनाथनचा बॉलिवूडमध्ये जलवा होता. त्यानंतर ती गायब झाली.
3 / 9
सुमन रंगनाथन सिनेमांमधून लोकप्रिय होत होती. पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत आली. याचा परिणाम तिच्या करिअरवरही झाला. यामुळेच ती एकाएकी पडद्यावरुन गायब झाली.
4 / 9
१९९७ साली सुमनचं फरहान अख्तरसोबत नाव जोडलं गेलं. 'मसाला डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तरच्या फ्लर्टी स्वभावाचा तिला राग यायचा. त्यांच्यात वाद झाला आणि त्यांचं नातं तुटलं. यानंतर एक वर्षाने फरहानने अधुनासोबत लग्न केलं होतं.
5 / 9
फरहान अख्तरनंतर सुमनचं नाव 'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयसोबत जोडलं गेलं. राहुलने तिला करिअरमध्ये पाठिंबा दिला. ते लिव्ह इनमध्येही राहत होते. मात्र हेही नातं फार काळ चाललं नाही.
6 / 9
२८ डिसेंबर २००० रोजी सुमनने बिझनेसमन गौतमसोबत लग्न केलं. मात्र आपापसातील मतभेदांमुळे तिने घटस्फोट घेतला. यानंतर ती निर्माता बंटी वालियासोबत लग्नबंधनात अडकली. एकता कपूरच्या पार्टीत तिचं बंटीसोबत खूप वाईट भांडण झालं आणि यानंतर ती कायमची त्याला सोडून गेली. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
7 / 9
आधी सुमनने बंटी वालियावर वाईट आरोप लावले. मात्र नंतर बंटीनेच सुमनवर आरोपांचा पाऊस पाडला. सुमनच तिच्याच चुलत भावासोबत अफेअर चालू असल्याचा त्याने खुलासा केला. तसंच आपली आणि परिवाराची प्रतिमा मलीन करण्यासाठी ती आरोप लावत आहे असंही तो म्हणाला.
8 / 9
इतकंच नाही तर सुमनने पोटगीमध्ये पालीमधला फ्लॅट, दर महिना २ लाख रुपये आणि आलिशान कारची मागणी केली असा त्याने खुलासा केला. आपलं प्रेम, पैसा आणि स्वातंत्र्याचा सुमनने गैरफायदा घेतल्याचं तो म्हणाला.
9 / 9
अखेर २०१९ साली सुमनने बिझनेसमन साजन चिनप्पा यांच्यासोबत लग्न केलं. आता ती संसारात व्यस्त आहे आणि बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या ती काऊंसिलर म्हणून काम करते. तसंच काही साऊथ सिनेमांमध्ये ती काम करत आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीफरहान अख्तर