'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:19 IST
1 / 7२००८ साली आलेला 'भूतनाथ'(Bhoothnath) सिनेमा आठवतोय? लहान मुलांचा तर हा आवडता सिनेमा. अमिताभ बच्चन यांनी यामध्ये भूतनाथ या भूताची भूमिका साकारली होती. 2 / 7सिनेमात एक क्युट बालकलाकारही 'बंकू' या मुख्य भूमिकेत होता. त्याचं खरं नाव अमन सिद्दीकी आहे. त्याला आपण इतरही अनेक सिनेमांमध्ये पाहिलं आहे. भूतनाथ वेळी तो ८ वर्षांचा होता. 3 / 7अमन आता मोठा झाला असून त्याला ओळखणंही कठीण झालंय. तो आता २५ वर्षांचा आहे. घाऱ्या डोळ्यांचा, गोबऱ्या गालाचा गोरा गोड मुलगा आता अगदीच बारीक दिसत आहे. 4 / 7अमन सिद्दीकी सोशल मीडियावर आहे. त्याचे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 'आता क्युटनेस राहिला नाही','बंकू आता बंकू राहिला नाही','हा तर लहानपणीच क्युट होता' अशा प्रतिक्रिया त्याच्या पोस्टवर आल्या आहेत.5 / 7तर काहींनी त्याला हँडसमही म्हटलं आहे. तो आता उंच मात्र अगदीच बारीक दिसत आहे. तरी त्याचे डोळे अजूनही तसेच आहेत. 6 / 7अमनने काही सिनेमा, जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर मात्र तो सिनेसृष्टीपासून दूर झाला. त्याचे इन्स्टाग्रामवर ७५०० फॉलोअर्स आहेत. त्याने त्याच्या अकाऊंटवर लहानपणी काढलेले सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.7 / 7अमनला म्युझिकमध्ये रस असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरुन दिसतं. तसंच तो डुडलिंग अँड स्केचिंगही करतो. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतलं आहे.