Join us

IN PICS : ‘खिलाडियों का खिलाडी’मधील अभिनेत्री बरखा मदान आठवतेय? एका निर्णयाने तिचं आयुष्यच बदललं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:00 AM

1 / 10
अक्षय कुमार व रेखाचा ‘खिलाडियों का खिलाडी’ हा सिनेमा आठवतो? आठवत असेल तर या चित्रपटातील आणखी एक चेहरा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तिचं नाव बरखा मदान. ‘खिलाडियों का खिलाडी’ हा बरखाचा पहिलाच सिनेमा होता. पण पहिल्या सिनेमात तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
2 / 10
मॉडेल, अभिनेत्री व निर्माती अशी तिची ओळख. तिने हिंदी व पंजाबी सिनेमात काम केलं. अनेक टीव्ही मालिकांमध्येही ती झळकली. काही शो तिने होस्ट केलेत. ही बरखा सध्या कुठे आहे?
3 / 10
तर सध्या बौद्ध धर्माचा प्रसार करते आहे. होय, 10 वर्षांआधी ग्लॅमरसची झगमगती दुनिया सोडून तिने अध्यात्माचा मार्ग पत्करला. तिने आपलं नावही बदललं.
4 / 10
सध्या ती Gyalten Samten या नावाने ओळखली जाते. पंजाबी कुटुंबात जन्मलेली बरखा मदान 1994 साली मिस इंडिया फाइनलिस्ट राहिली आहे. सुश्मिता सेन व ऐश्वर्या राय सुद्धा तिच्या रांगेत होत्या.
5 / 10
एक यशस्वी मॉडेल बनल्यानंतर 1996 साली तिने ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात अक्षय व रेखा लीड रोलमध्ये होते. पण बरखाचा रोलही डोळ्यात भरण्यासारखा होता.
6 / 10
‘खिलाडियों का खिलाडी’नंतर बरखाला चित्रपटाच्या अनेक ऑफर मिळाल्या. पण तिने काही निवडक चित्रपट स्वीकारले. याचवेळी तिने आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतही एन्ट्री घेतली. Indo-Dutch मुव्ही Driving Miss Palmen मध्ये ती झळकली. हा सिनेमा 2000 साली रिलीज झाला होता.
7 / 10
2003 साली बरखाला फिल्मी करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला. रामगोपाल वर्माच्या ‘भूत’ या सिनेमात तिने भूताची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचं जबरदस्त कौतुक झालं.
8 / 10
यानंतर बरखा निर्मिती क्षेत्रात उतरली. तिने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस उघडलं. सोच लो आणि Surkhaab या चित्रपटाची निर्मिती तिने केली. या दोन्ही चित्रपटांत ती लीड रोलमध्ये होती.
9 / 10
टीव्हीवरही तिने एन्ट्री केली. सुमारे 20 मालिकांत तिने काम केलं. पण याच वळणावर तिला बौद्ध धर्माच्या विचारधारेनं प्रभावित केलं. खरं तर बालपणीच सिक्कीमच्या एका बौद्ध मठात गेल्यावर तिला याचा साक्षात्कार झाला होता.
10 / 10
2012 मध्ये तिने बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसाराच्या कामात स्वत:ला वाहून घेतलं. तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात योग्य निर्णय होता, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
टॅग्स :सेलिब्रिटीअक्षय कुमाररेखाबॉलिवूड