Join us

भाग्यश्रीच्या लेकीला कधी पाहिलंय का? तिच्या सौंदर्यापुढे सारा, जान्हवीदेखील आहेत फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 1:55 PM

1 / 10
1989 मध्ये सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे 'मैंने प्यार किया'. अभिनेता सलमान खान आणि भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्या काळी तुफान गाजला होता. विशेष म्हणजे आजही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 10
या चित्रपटानंतर भाग्यश्री रातोरात सुपरस्टार झाली होती. इतकंच नाही तर तिच्या चाहतावर्गात तुफान वाढ झाली होती. परंतु, यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने अचानकपणे बॉलिवूडपासून फारकत घेतली.
3 / 10
लग्नानंतर भाग्यश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे यावेळी भाग्यश्री तिच्यासोबतच तिच्या लेकीमुळे आणि मुलामुळे चर्चेत येत आहे.
4 / 10
अलिकडेच भाग्यश्रीच्या मुलाने अभिमन्युने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. परंतु, तिची लेक अवंतिका दसानी (Avantika Dassani) मात्र या कलाविश्वापासून दूर आहे.
5 / 10
अवंतिका बॉलिवूडपासून जरी दूर असली तरीदेखील सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टीव्ह असून अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 10
भाग्यश्रीची लेक अवंतिका २५ वर्षांची असून ती प्रचंड सुंदर दिसते. त्यामुळे कलाविश्वात येण्यापूर्वीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
7 / 10
अवंतिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सिने इंडस्ट्रीमध्ये येण्याविषयी तिचा सध्या कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात येतं.
8 / 10
अवंतिकाला ट्रॅव्हलिंग, डान्सिंग, फॅशन, पार्टी करणे या सगळ्या गोष्टींची आवड असल्याचं सांगण्यात येतं.
9 / 10
अवंतिका आणि भाग्यश्रीचं खूप चांगलं बॉण्डिंग असून अनेकदा या मायलेकी एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.
10 / 10
अवंतिकाने लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये तिने डिग्री घेतल्याचं सांगण्यात येतं.
टॅग्स :भाग्यश्रीसेलिब्रिटीबॉलिवूडसलमान खान