Join us

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 7: कार्तिक आर्यनचा 'भुलभुलैया २' लवकरच गाठेल १०० कोटींचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 1:02 PM

1 / 9
लवकरच भूल भुलैया २ हा १०० कोटींची कमाई करणारा २०२२ मधील पाचवा चित्रपट ठरणार आहे. यासोबतच हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.
2 / 9
कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया २ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करण्याच्या तयारीत आहे.
3 / 9
एका आठवड्याच्या आत, भूल भुलैया २ ला जबरदस्त कमाई करण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय.
4 / 9
तसेच कार्तिक आर्यनच्या भुल भुलैया २ चित्रपटाने कंगना राणौतच्या 'धाकड'ला मागे टाकले आहे. 'धाकड' ६ दिवसात ४ कोटीपर्यंत कमाई करू शकलेला नाही.
5 / 9
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी बनवलेल्या भूल भुलैया २ चे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने गुरुवारी बॉक्स ऑफिसवर ७.२७ कोटींची कमाई केली.
6 / 9
यासह चित्रपटाची एकूण कमाई ९२.०५ कोटींवर गेली आहे. हळूहळू हा चित्रपट १०० कोटींच्या जवळपास वाढत आहे. अशा परिस्थितीत, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, भूल भुलैया २ लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एंट्री करेल असे मानले जात आहे.
7 / 9
जबरदस्त कॉमेडी, मजेदार संवाद आणि धडकी भरवणाऱ्या भूल भुलैया २ चित्रपटाचा प्रेक्षक आनंद घेत आहेत. चित्रपट पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे.
8 / 9
चित्रपटाने शुक्रवारी १४.११ कोटी रुपये, शनिवारी १८.३४ कोटी रुपये, रविवारी २३.५१ कोटी रुपये, सोमवारी १०.७५ कोटी रुपये, मंगळवारी ९.५६ कोटी रुपये आणि बुधवारी ८.५१ कोटी रुपये कमावले.
9 / 9
लवकरच भूल भुलैया २ वर्ष २०२२ मधील पाचवा चित्रपट ठरणार आहे. जो १०० कोटींची कमाई करेल. यासोबतच हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे.
टॅग्स :भूल भुलैय्याकार्तिक आर्यन