Join us

इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:57 IST

1 / 11
टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांची आई मेय मस्क (Maye Musk) यांनी भारतीयांचे लक्ष वेधले आहे.
2 / 11
मेय मस्क त्यांच्या 'अ वुमन मेक्स अ प्लॅन' या पुस्तकाच्या हिंदी प्रकाशनासाठी भारतात आल्या आहेत.
3 / 11
७० वर्षीय मेय मस्क यांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शन (Maye Musk visits Mumbai's Siddhivinayak Temple with Jacqueline Fernandez) घेतलं.
4 / 11
त्यांचे दर्शनावेळीचे फोटो समोर आले आहेत.
5 / 11
जॅकलिन आणि मेय मस्क यांचे मंदिरात पूजा करताना आणि मंदिराच्या पुजाऱ्याकडून आशीर्वाद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 11
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आलेली जॅकलिन फर्नांडिस सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. इलॉन मस्क यांची आई देखील पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसल्या.
7 / 11
मंदिराला भेट देण्याबाबत जॅकलीन म्हणाली, 'मेय यांच्यासोबत मंदिरात दर्शन घेणं हा खूप सुंदर अनुभव होता. मेय यांचे पुस्तक एका महिलेच्या लवचिकतेचे प्रतीक आहे. मला खूप काही शिकवलं आहे. विशेषतः वय हा फक्त एक आकडा आहे आणि ते तुमची स्वप्ने आणि ध्येये परिभाषित करू शकत नाही', असं तिनं म्हटलं.
8 / 11
दरम्यान, इलॉन मस्क यांची आई मेय मस्क या व्यवसायाने मॉडेल आहेत. ७० वर्षांच्या वयातही त्या अजूनही मॉडेलिंग करत आहेत. मोटिवेशनल स्पीकर म्हणून मेय मस्क जगभर व्याख्यान देत असतात.
9 / 11
जॅकलिनच्या आईचे या महिन्याच्या सुरुवातीला निधन झालं. आईच्या निधनानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.
10 / 11
जॅकलिनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'फतेह'मध्ये दिसली होती. आता अभिनेत्री अजय देवगण स्टारर 'रेड २' मध्ये एका खास डान्स नंबरमध्ये दिसणार आहे.
11 / 11
याशिवाय, जॅकलिनचे 'वेलकम टू द जंगल' आणि 'हाऊसफुल ५' हे चित्रपटही २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसएलन रीव्ह मस्कसिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबई