Join us

बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:28 AM

1 / 13
बिपाशा बसु कधी काळी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री राहिलीये. ती स्ट्रॉंग व्यक्ती म्हणूनही ओळखली जाते. कारण तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा हिंमतीने सामना केला. अनेक वेगवेगळे अनुभव तिला करिअरमध्ये आलेत. करिअरच्या सुरूवातीच्या वाईट अनुभवांची तिने आठवण काढलीय. (All Image Credit : Social Media and Google.com)
2 / 13
ही बिपाशाच्या करिअरच्या सुरूवातीची गोष्ट आहे. ती सुरूवातीपासूनच लोकांसोबत स्ट्रेट वागत होती आणि त्या कारणानेच इंडस्ट्रीत तिच्यासोबत कुणी वाईटपणे वागण्याआधी १० वेळा विचार करत होते. पण एकदा तिच्यासोबत एका निर्मात्याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.
3 / 13
एका मुलाखतीत बिपाशाने सांगितले की, मी फार तरूण होते आणि घरात एकटीच राहत होते. लोकांमध्ये माझी इमेज एकदम तेज आणि सरळ बोलणारी मुलगी अशी होती. त्यामुळे अनेक लोक मला घाबरत होते.
4 / 13
तिने सांगितले की, पण एकदा असं झालं होतं. मला आठवतं मी एका टॉप प्रोड्युसरसोबत सिनेमा साइन केला होता. जेव्हा मी परत आली तेव्हा त्याने मला मेसेज केला. 'तुझ्या स्माइलची आठवण येत आहे'. त्यावेळी मला तो मेसेज फारच विचित्र वाटला होता.
5 / 13
बिपाशा म्हणाली की, त्या प्रोड्युसरचा काही दिवसांनी पुन्हा तोच मेसेज आला होता. त्यावेळी मी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा काही दिवसांनी तोच मेसेज आला. पण त्यानंतर मी चुकून त्या प्रोड्युसरला एक मेसेज पाठवला आणि प्रोड्युसर नरमला.
6 / 13
बिपाशा सांगते की, ती तिच्या मित्राला काहीतरी रागाने मेसेज करत होती. हा मेसेज चुकून त्या प्रोड्युसरला पाठवला गेला. हा चुकून गेलेला मेसेज माझ्या कामात आला. त्यानंतर त्या प्रोड्युसरने मला कधीही मेसेज केला नाही.
7 / 13
त्यानंतर बिपाशाने सांगितले की, मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले की, त्या प्रोड्युसरने सिनेमा साइन करण्याचे जे पैसे दिले आहेत ते सगळे त्याला परत कर.
8 / 13
बिपाशाने हेही सांगितले की, काही दिवसांनी एका इव्हेंटमध्ये त्या प्रोड्युसरच्या समोर ती आली होती. तेव्हा त्याने तिला बघताच रस्ता बदलला होता. तो नजारा फारच फनी होता.
9 / 13
बिपाशाने लग्नानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. ३० एप्रिल २०१६ मध्ये तिने अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं होतं. तेव्हापासून ती ब्रेकवर होती.
10 / 13
11 / 13
आता तिने कमबॅक केलं असून ती पती करण सिंह ग्रोवरसोबत 'डेंजरस' या वेबसीरीजमध्ये एकत्र दिसत आहे.
12 / 13
13 / 13
टॅग्स :बिपाशा बासूबॉलिवूड