1 / 15नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. 1935 साली वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी तलाश-ए-हक या सिनेमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले.2 / 15अभिनेत्री म्हणून 1942 मध्ये त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या.3 / 15हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते.4 / 15राज कपूर यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. मात्र नर्गिस यांच्याविषयी बोलायचे झाल्यास राज कपूर त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.5 / 15'आग' या सिनेमाद्वारे राज कपूर आणि नर्गिस यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली होती. तर 'बरसात' या सिनेमापासून त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती.6 / 15 नर्गिस यांनी राज कपूर यांच्यासोबत एकुण 16 सिनेमे केले7 / 15नर्गिस 19 वर्षांच्या असताना राज कपूर यांची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात झाली होती. 8 / 15 मात्र या दोघांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकू शकले नव्हते. कारण राज कपूर विवाहित होते. नर्गिस यांनी राज यांना त्यांची पत्नी कृष्णा यांच्यापासून घटस्फोट घेण्यास सांगितला होता. मात्र राज कपूर यांनी तसे केले नाही.9 / 15 नर्गिस यांनी दहा वर्षे राज कपूर यांची वाट बघितली. मात्र राज कपूर त्यांच्या आयुष्यात परतले नाही.10 / 15राज कपूर यांच्यानंतर सुनील दत्त नर्गिस यांच्या आयुष्यात आले.11 / 15सुनील दत्त यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले होते. या घटनेनंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडल्या.12 / 15मेहबूब खान यांच्या 'मदर इंडिया'त त्यांनी एकत्र काम केले होते. सुनील दत्त नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेत होते.13 / 1514 / 151 जून 1929 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या नर्गिस यांनी 3 मे 1981 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.15 / 15संजयचा 'रॉकी' हा पहिला सिनेमा रिलीज होणार होता. या सिनेमाच्या प्रीमिअरच्या अगदी तीन दिवसांपूर्वीच कॅन्सरमुळे नर्गिस यांचे निधन झाले.