Join us

PHOTOS : इतक्या वर्षात इतका बदलला अक्षय खन्ना, फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 8:00 AM

1 / 12
‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अक्षय खन्ना याच्यावर कधीकाळी तरूणी फिदा होत्या. आज हाच अक्षय खन्ना पहिल्या नजरेत ओळखू येऊ नये, इतका बदलला आहे.
2 / 12
आज अक्षय मोजक्या सिनेमात दिसतो. पण आधीचा अक्षय आणि आत्ताचा अक्षय यात बराच बदल झाला आहे.
3 / 12
डोक्यावरचे सर्व केस गायब झाले असून चेह-यावर सुरकुत्या वाढल्या आहेत.
4 / 12
मध्यंतरी अक्षय खन्ना ब-याच दिवसानंतर अचानक दिसला होता. क्लिन शेव आणि डोक्यावर टक्कल पाहून लोकांनी त्याची तुलना जॅसन स्टेथमसोबत केली होती. (जॅसन स्टेथम या हॉलिवूडच्या सुपरस्टारने फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस अणि ट्रान्सपोर्टर सारखे शानदार सिनेमे दिले आहेत.)
5 / 12
वयाच्या 18 व्या वर्षी अक्षयने त्याचे अ‍ॅक्टिंग करिअर सुरु केले. अक्षयच्या करिअरमध्ये अनेक चढऊतार आलेत.
6 / 12
फ्लॉप सिनेमे कलाकारांचे करिअर संपवतात. पण अक्षयबाबतीत असे काही घडले नाही. बरेच फ्लॉप सिनेमे देऊनही त्याच्या करिअरचा ग्राफ सतत चढता राहिला.
7 / 12
1997 मध्ये अक्षयने हिमालय पुत्र या सिनेमातून डेब्यू केला होता. हा सिनेमा दणकून आपटला. पण याच वर्षी त्याचा ‘बॉर्डर’ सिनेमा रिलीज झाला आणि अक्षयच्या करिअरला गती मिळाली.
8 / 12
यानंतर अक्षयचे मोहब्बत, कुदरत, लावारिस, भाई भाई असे अनेक सिनेमे आलेत आणि फ्लॉप झालेत.
9 / 12
यानंतर 1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबत ‘आ अब लौट चले’ आला आणि अक्षयचे करिअर सावरले.
10 / 12
अक्षय व ऐश्वर्याची जोडी यानंतर ‘ताल’मध्येही दिसली. 2001 मध्ये ‘दिल चाहता है’ या सिनेमात अक्षयने आमिर व सैफला जबरदस्त टक्कर दिली.
11 / 12
‘दिल चाहता है’ हा सिनेमा अक्षय खन्नाच्या करिअरमधील टर्निंग प्वॉइंट होता. यानंतर हमराज आणि गांधी माय फादर या सिनेमात त्याने दमदार भूमिका साकारल्या.
12 / 12
दोन दशकांच्या करिअरअमध्ये अक्षयने विनोदी ते गंभीर अशा सर्व धाटणीच्या वेगवेगळ्या भूमिका जिवंत केल्या. आजही लोक अक्षय खन्नाच्या प्रेमात आहेत, ते याचमुळे. पिता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अक्षय खन्ना कोलमडला होता. दीर्घकाळ तो सिनेमांपासूनही दूर होता.
टॅग्स :अक्षय खन्ना