कधी काळी होती साधना होती सर्वाधिक महागडी अभिनेत्री, अखेरच्या दिवसांत अशी झाली होती अवस्था By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 12:23 PM1 / 12कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या या साधनाची आज (२ सप्टेंबर) जयंती. २ सप्टेंबर १९४१ रोजी साधनाचा जन्म झाला.2 / 12६० ते ७० च्या दशकात हिंदी पडदा गाजवणारी अभिनेत्री साधना हिने मेरा साया, आरजू, एक फुल दो माली, लव्ह इन शिमला, वक्त, वो कौन थी अशा अनेक चित्रपटांत अजरामर भूमिका साकारल्या. तिची साधना कट त्याकाळी तरूणींमध्ये कमालीची लोकप्रीय झाली होती. 3 / 12 साधनाचा जन्म पाकिस्तानातील कराचीत एका सिंधी कुटुंबात झाला. फाळणीनंतर तिचे कुुटुंब कराचीतून मुंबईत आले.4 / 12 आपल्या आईवडिलाची एकुलती एक मुलगी असलेल्या साधनाच्या वडिलांना अभिनेत्री साधना बोस कमालीची आवडायची. म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव साधना ठेवले.5 / 12 ८ वर्षे साधनाने घरीच शिक्षण पूर्ण केले. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, साधना आणि कपूर घराण्याचेही एक नाते आहे. होय, कपूर घराण्याची सून बबिता हिचे वडील हरी शिवदासानी आणि साधनाचे वडिल सख्खे भाऊ होते.6 / 12केवळ १४ व्या वर्षी साधनाने चित्रपटांत काम करणे सुरु केले. राज कपूर यांच्या ‘श्री420’ या चित्रपटातील मूड मूड के ना देख या गाण्याच्या कोरसमध्ये साधना होती. यानंतर १६ व्या वर्षी ‘अबाना; या सिंधी चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली. या चित्रपटासाठी तिला केवळ १ रुपया मानधन मिळाले होते. 7 / 12या चित्रपटानंतर एका मॅगझिनमध्ये साधनाचा फोटो प्रकाशित झाला. त्यावेळचे सुप्रसिद्ध निर्माते सशाधर मुखर्जींनी हा फोटो पाहिला आणि साधनाला ‘लव्ह इन शिमला’ हा चित्रपट मिळाला. 8 / 12खरे तर ‘लव्ह इन शिमला’ चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर यांना साधनाचा चेहरा काहिसा विचित्र वाटत होता. तिचे माथे बरेच मोठे होते. मग त्यांनी तिला हॉलिवूड अभिनेत्री आॅडी हेपबर्नसारखी हेअरस्टाईल करण्याची गळ घातली आणि पुढे साधनाची ही हेअरस्टाईलचं तिची ओळख बननी.9 / 12आर. के. नय्यर यांच्या अनेक चित्रपटांत साधना दिसली आणि पुढे ती नय्यर यांच्याच प्रेमात पडली. 10 / 12साधना व आर. के. नय्यर यांनी१९६६ मध्ये दोघांनीही लग्न केले. साधनाच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. कारण नय्यर तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. 11 / 12९९५ मध्ये पतीच्या निधनानंतर साधना मुंबईच्या एका जुन्या बंगल्यात एकटी राहायची. हा बंगला आशा भोसले यांचा होता. अखेरच्या दिवसांत साधनाला थायरॉईड झाला़.यामुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाला होता. साधनाला मुलंबाळ नव्हती. कुणीही मित्र नव्हते. यामुळे तिने अखेरच्या दिवसांत इंडस्ट्रीतल्या लोकांची मदत मागितली. पण कुणीही समोर आले नाही.12 / 12 साधनाची एकमेव मैत्रिण अभिनेत्री तबस्सूम यांनी २०१५मध्ये दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. २५ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईतचं साधनाने अखेरचा श्वास घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications