विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 5:00 PM1 / 12साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. तरूणींच्या गळ्यातील तो ताईत आहेत. आज त्याचा वाढदिवस.2 / 12बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. कधीकाळी याच विजय देवरकोंडाकडे घराचे भाडे द्यायला पैसे नव्हते. आज तो कोट्यवधींचा मालक आहे.3 / 12हैदराबादेत त्याचा अलिशान घर आहे. अलीकडे 20 कोटी रूपयांत त्याने हे डुप्लेक्स घर खरेदी केले होते.4 / 12या घरात विजय आई-बाबा व भावासोबत राहतो. विजयच्या घराचे फोटो पाहून त्याच्या अलिशान आयुष्याचा अंदाज यावा.5 / 12मॉर्डन, क्लासी ड्रॉर्इंग रूम, लॅव्हिश टेरेस एरिया असा त्याचा थाट आहे.6 / 129 मे 1989 रोजी एका तेलगू कुटुंबात विजय देवरकोंडाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवरकोंडा गोवर्धन राव आणि आईचे नाव माधवी देवरकोंडा आहे.7 / 12देवरकोंडा गोवर्धन राव हे दाक्षिणात्य छोट्या पडद्यावरील कलाकार आहेत. विजय देवरकोंडाच्या धाकट्या भावाचे नाव आनंद देवरकोंडा आहे.8 / 12विजय देवरकोंडाचे कुटुंब त्याला राऊडी नावाने हाक मारतात. यामुळेच त्याचे चाहते त्याला राउडी देखील म्हणतात.9 / 122011 साली विजयने मध्ये दक्षिण सिनेमातून पदार्पण केले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नुव्विला’ असे होत़े. हा मल्टीस्टारर चित्रपट होता.10 / 12यानंतर विजय देवरकोंडाने अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. परंतु ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळाली. तो भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.11 / 12विजय देवरकोंडा चित्रपट निर्माताही आहे. हिल एंटरटेनमेंट असे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचे नाव आहे. याच अंतर्गत त्याने गेल्या वर्षी मीकू माथ्राममे चित्ता या चित्रपटाची निर्मिती केली.12 / 12याशिवाय ‘राउडी वेअर’ या नावाचा त्याचा क्लोदिंग ब्रँड आहे. एकेकाळी पैसे नसल्याने बँक अकाउंट सील झालेल्या विजयच्या खात्यात आज कोट्यवधी रुपये आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications