Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 03:59 PM2024-12-11T15:59:25+5:302024-12-11T16:19:26+5:30

Bobby Deol : एका इव्हेंटमध्ये बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलताना दिसला.

बॉबी देओलने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्याने आपल्या करिअरमध्ये खूप चढ-उतारही पाहिले.

आता अलीकडेच एका इव्हेंटमध्ये बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलताना दिसला. त्याच्या स्ट्रगलचा त्याच्या कुटुंबावर किती वाईट परिणाम झाला हे त्याने सांगितलं.

याबाबत बोलताना बॉबी भावुक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पाणवलेल्या डोळ्यांनी अभिनेता म्हणाला - "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला आहे."

"आपण सर्वजण एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आम्ही एकत्र राहतो. मला माहीत आहे की, मला वेदना होत असलेल्या पाहून त्या लोकांनाही वेदना होत होत्या."

बॉबीला रडताना पाहून सनी देओलने त्याला सांभाळलं आणि त्याला शांत केलं, त्याचे अश्रू पुसले. बॉबी त्याच्या अनुभवावरून पुढे म्हणाला - मुद्दा असा आहे की, आयुष्यात कधीही हार मानू नका.

बॉबी देओल ॲनिमल या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील बॉबीचा दमदार अभिनय आणि अनोख्या शैलीने चाहत्यांना वेड लावलं होतं.

बॉबी देओलचे अनेक चित्रपट यापुढे येणार आहेत. तो लवकरच हाऊसफुल 5, अल्फा आणि दोन तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

अभिनेत्या आपल्या अभिनयाने आता स्वत:ची एक वेगळीच छाप पाडली आहे. आश्रम या वेबसीरिजमध्ये देखील त्याने उत्तम काम करत आपल्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.