Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 3:59 PM1 / 9बॉबी देओलने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्याने आपल्या करिअरमध्ये खूप चढ-उतारही पाहिले.2 / 9आता अलीकडेच एका इव्हेंटमध्ये बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलताना दिसला. त्याच्या स्ट्रगलचा त्याच्या कुटुंबावर किती वाईट परिणाम झाला हे त्याने सांगितलं.3 / 9याबाबत बोलताना बॉबी भावुक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पाणवलेल्या डोळ्यांनी अभिनेता म्हणाला - 'माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला आहे.'4 / 9'आपण सर्वजण एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आम्ही एकत्र राहतो. मला माहीत आहे की, मला वेदना होत असलेल्या पाहून त्या लोकांनाही वेदना होत होत्या.'5 / 9बॉबीला रडताना पाहून सनी देओलने त्याला सांभाळलं आणि त्याला शांत केलं, त्याचे अश्रू पुसले. बॉबी त्याच्या अनुभवावरून पुढे म्हणाला - मुद्दा असा आहे की, आयुष्यात कधीही हार मानू नका.6 / 9बॉबी देओल ॲनिमल या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील बॉबीचा दमदार अभिनय आणि अनोख्या शैलीने चाहत्यांना वेड लावलं होतं. 7 / 9बॉबी देओलचे अनेक चित्रपट यापुढे येणार आहेत. तो लवकरच हाऊसफुल 5, अल्फा आणि दोन तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे.8 / 9अभिनेत्या आपल्या अभिनयाने आता स्वत:ची एक वेगळीच छाप पाडली आहे. आश्रम या वेबसीरिजमध्ये देखील त्याने उत्तम काम करत आपल्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications