"त्याला नक्की पश्चाताप होईल..",तब्बू अविवाहित असण्यामागे अजय देवगण आहे कारणीभूत By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:11 PM1 / 8तब्बू(Tabu) आणि अजय देवगण(Ajay Devgn)ने 90 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. अजय देवगणसोबत, तब्बूने विजयपथ (1994), हकीकत (1995), ठक (1999), दृश्यम (2015), गोलमाल अगेन (2017) आणि दे दे प्यार दे (2019) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.2 / 8तब्बू (Tabu) आणि अजय देवगण (Ajay Devgn) ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे. दोन स्टार्स आता 'दृश्यम 2' आणि 'भोला' मध्ये देखील स्क्रीन स्पेस शेअर करतील, जो अॅक्शन-ड्रामा आणि 'कैथी' चित्रपटाचा रिमेक आहे.3 / 8तब्बूने नुकताच अजय देवगणबद्दल जो खुलासा केला आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला की, अजय तिची जासूसी करायचे. एवढेच नाही तर तिच्या आजूबाजूला फिरणाऱ्या किंवा बोलणाऱ्या मुलांनाही तो धमकावत असे. (Photo Instagram)4 / 8प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर यायचे. माझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास हे दोघे त्याला धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली होती.(Photo Instagram)5 / 8अभिनेत्रीने सांगितले की, अजय तिचा भाऊ समीरचा शेजारी होता. समीर आणि अजय मिळून तिची जासूसी करायचे आणि जो मुलगा तिच्या आसपास फिरायचा किंवा तिच्याशी बोलायचा, ते दोघेही त्याला धमक्या द्यायचे.6 / 8 मी आजही अविवाहित ते फक्त आणि फक्त अजय देवगणमुळेच. कारण अजय आणि तब्बूचा चुलत भावा तिच्यावर लक्ष ठेवायचा. यामुळेच तिच्या आयुष्यात कुणी मुलगा आला नाही.7 / 8लग्नाबाबत खिल्ली उडवताना तब्बू म्हणाली की, माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणी असेल तर तो अजय आहे..(Photo Instagram)8 / 8तब्बू म्हणाली होती की, अजय तिला चांगलाच ओळखतो, माझ्यासाठी काय योग्य आहे हे त्याला माहीत आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications