Join us

एकेकाळी मुलाची शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे;अभिनयाला कॉमेडीची जोड देत मिळवली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 4:43 PM

1 / 7
जावेद जाफरी हे हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते तसेच प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप जाफरी यांचे सुपुत्र आहेत. अभिनयाचा कौंटुबिक वारसा असातानाही जावेद यांनी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
2 / 7
चित्रपटांमध्ये जावेद जाफरी हे मुख्य भूमिकेत नसले तरी त्यांनी केलेल्या सहकलाकाराच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून जावेद जाफरी यांची इंडस्ट्रीत ओळख आहे.
3 / 7
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. अपार मेहनत आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर जावेद यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली.
4 / 7
जावेद जाफरी यांनी आपल्या करीअरची सुरूवात एक कॉमेंट्री आणि अवॉर्ड शो होस्ट करून केली. त्यांनी जापानी टीव्ही शो 'Takeshi's Castle' आणि 'निंजा वॉरिअर' या अशा शोजची कॉमेंट्री करून केली आहे. त्यानंतर त्यांनी काही अवॉर्ड शो देखील हॉस्ट केले.
5 / 7
१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेरी जंग' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'वो फिर आएगी', '100 डेज', 'तहलका', 'जीना मरना तेरे, 'अमन के फरिश्ते' अशा चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका वठवल्या आहेत.
6 / 7
परंतु जावेद जाफरी यांना चित्रपटांधून जेवढी प्रसिद्धी नाही मिळाली तितकी प्रसिद्धी त्यांना टीव्ही रिॲलिटी शोमधून मिळाली. 'बूगी वूगी' या एका डान्स रिअॅलीटी शोमुळे ते प्रकाशझोतात आले.
7 / 7
मिजान जाफरीने म्हणजेच जावेद जाफरींच्या मुलाने 'IANS' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या वडीलांनी आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. केवळ आपल्या मुलाची शाळेतील फी भरण्यासाठी तसेच घरातील वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने जावेद जाफरींनी मिळेल त्या चित्रपटात काम केले.
टॅग्स :बॉलिवूडजावेद जाफरी