Join us

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 6:20 PM

1 / 11
बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या गोविंदाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासूनच त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या.
2 / 11
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गोविंदाने धनुष्यबाण हाती घेत त्याच्या राजकीय प्रवासाला नव्याने सुरुवात केली आहे.
3 / 11
गोविंदाला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
4 / 11
याआधी गोविंदाने काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणुक लढवली होती. २००४ साली त्याने उत्तर मुंबईच्या जागेवर निवडणुक लढवली होती.
5 / 11
भाजपाच्या राम नाईक यांचा परावभ करून तो निवडूणही आला होता. राजकीय करिअरसाठी त्याने बॉलिवूडला रामराम केला होता.
6 / 11
त्याने पुन्हा कमबॅक करण्याचाही प्रयत्न केला होता. पण, यात त्याला अपयश आलं. गेल्या कित्येक वर्षांपासून गोविंदाने एकही सिनेमा केलेला नाही. पण तरीही त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे.
7 / 11
बॉलिवूड गाजवणारा गोविंदा संपत्तीच्या बाबतीतही राजा बाबू आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या गोविंदाची एकूण संपत्ती तुम्हाला माहीत आहे का?
8 / 11
गोविंदाचा मुंबईत आलिशान बंगला आहे. त्याची किंमत सुमारे १६ कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याचा जुहू परिसरातही एक बंगला आहे.
9 / 11
याबरोबरच त्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. तिथून त्याची चांगली कमाई होते. गोविंदाकडे अनेक लक्झरी गाड्याही आहेत.
10 / 11
याव्यतिरिक्त गोविंदा ब्रँड एंडोर्समेंटमधून कोटींची कमाई करतो. वर्षाला जवळपास तो १६ कोटींची कमाई करतो.
11 / 11
मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा एकूण १७० कोटींचा मालक आहे.
टॅग्स :गोविंदाशिवसेनाएकनाथ शिंदे