Join us

ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 3:05 PM

1 / 7
दाढी, मिशा वाढवलेल्या या अभिनेत्याला ओळखलं का? या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे
2 / 7
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून त्याचं नाव आहे इमरान खान. इमरान खान तब्बल ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करायला रेडी आहे
3 / 7
इमरान खानने बॉलिवूडमध्ये 'जाने तू या जाने ना', 'दिल्ली बेल्ली' असे सिनेमे चांगलेच गाजवले आहेत. परंतु त्यानंतर इमरानच्या सिनेमांना हवं तसं यश मिळालं नाही
4 / 7
आता मीडिया रिपोर्टनुसार २०१० साली आलेल्या दीपिका पादुकोणच्या 'ब्रेक के बाद' या सिनेमाच्या दिग्दर्शकांसोबत इमरान नव्या सिनेमातून भेटीला येणार आहे
5 / 7
इमरान खान शेवटी आपल्याला २०१५ मध्ये कंगना रणौतसोबत आलेल्या 'कट्टी बट्टी' सिनेमात दिसला होता. त्यानंतर मात्र इमरान इंडस्ट्रीतून गायब झाला
6 / 7
मधल्या काळात इमरानचं वजन कमी झालेलं. त्याला एखादा आजार झाला असंही बोललं जात होतं. परंतु या चर्चांमध्ये काही तथ्य नाही असं समजलं
7 / 7
आता ९ वर्षांनी 'जाने तू या जाने ना' स्टारला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अभिनय करताना पाहण्यास त्याचे चाहते उत्सुक आहेत यात शंका नाही
टॅग्स :इम्रान खानइमरान खान