भिंतींवर पोस्टर्स लावले, शेंगदाणे विकले; एका चित्रपटाने नशीबच पालटलं, वाचा 'या' अभिनेत्याबद्दल खास गोष्टी... By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 5:05 PM1 / 7अभिनेता जॅकी श्रॉफ हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव आहे. १९८० ते ९० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचा उद्या वाढदिवस आहे. प्रेक्षकांचा लाडका जग्गु दादा वयाच्या ६६ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 2 / 7बॉलिवूडचा जग्गु दादा म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी महाराष्ट्रात झाला. मुंबईतील ग्रॅंट रोड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. 3 / 7हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर पोहण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. जॅकी श्रॉफ यांचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास फार काही सोपा नव्हता. एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून त्यांनी चाहत्यांची मने त्यांनी जिंकली. 4 / 7१९८३ मध्ये 'हिरो' चित्रपटातू त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आतापर्यंत त्यांनी सुमारे २२० चित्रपटांमध्ये काम केले असून त्यात 'कर्म', 'खलनायक', 'राम-लखन', 'सौदागर', 'बॉर्डर', 'रंगीला' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. जॅकी श्रॉफ 'बागी ३', 'भारत', 'सूर्यवंशी' आणि 'राधे' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्येही दिसले आहेत.5 / 7एका मुलाखतीदरम्यान जॅकी श्रॉफ यांनी सांगितले होते की, लहानपणी ते चित्रपट प्रदर्शित होण्याची आणि निवडणुकीची वाट पाहत असत. ज्यामुळे त्यांना मित्रांसह भिंतींवर पोस्टर्स चिकटवण्याचे काम मिळायचे. दुपारपर्यंत हे काम केल्याने त्याला चार आणे मिळायचे. 6 / 7आणखी कमाई व्हावी यासाठी ते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या दिवशी परेड आणि ध्वजारोहणासाठी आलेल्या लोकांमध्ये ते भाजलेले शेंगदाणे आणि हरभरे विकत असत, असेही त्यांनी सांगितले होते. या मिळालेल्या पैशातून ते मिठाईच्या दुकानातून जिलेबी विकत घेऊन खायचे.7 / 7'शोमॅन' सुभाई घई यांनी १९८३ साली 'हिरो' चित्रपट बनवला होता. या चित्रपटात जॅकीची भूमिका साकारणारा नायक आता जॅकी श्रॉफच्या नावाने ओळखला जातो. चित्रपटसृष्टीचा हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांसारख्या सुपरस्टारची जादू मोठ्या पडद्यावर काम करत होती. जॅकी श्रॉफ यांचा आयुष्याला हिरो चित्रपट कलाटणी देणारा ठरला. आणखी वाचा Subscribe to Notifications