एकवेळचं जेवणही नव्हतं; पाणी पिऊन काढले दिवस; आज कोट्यवधींचा मालक आहे हा अभिनेता By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 5:39 PM1 / 7अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या अभिनेत्याने कलाविश्वात स्वत: चं अढळ स्थान निर्माण केलं आहे. हा अभिनेता म्हणजे राजकुमार राव.2 / 7'स्री- २' च्या यशानंतर सध्या अभिनेता राजकुमार राव 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.3 / 7एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत अभिनेत्याने प्रेक्षकांना त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. परंतु त्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता.4 / 7रणवीर अलाहाबादिला दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार रावने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं. 5 / 7या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, 'कधी-कधी तर माझ्याकडे पैसेच नसायचे. त्यावेळी उपाशीपोटी पाणी पिऊन दिवस काढावे लागत होते. हाती काम नसल्यामुळे मला खर्चासाठी घरचे पैसे द्यायचे. त्यासोबत एक वेळ अशी जेव्हा एकाच वेळी १०-१० ठिकाणी ऑडिशन्स द्यावे लागत होते'. 6 / 7पुढे राजकुमार रावने सांगितलं, की 'तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये फक्त १८ रुपये होते'.7 / 7सध्याच्या घडीला या अभिनेत्याची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार राव ८१ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications