Join us

शाहरूखने १३ कोटींना घेतला होता 'मन्नत'; आता त्याची किंमत किती झालीय माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 3:14 PM

1 / 10
कलाविश्वातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत किंग खान अर्थात शाहरुख खान याचं आवर्जुन नाव घेतलं जातं.
2 / 10
आलिशान लाइफ, लक्झरी गाड्या आणि त्याचं घर मन्नत यांची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते.
3 / 10
विशेष म्हणजे शाहरुखच्या घराचं म्हणजेच वांद्रे येथे असलेल्या त्याच्या मन्नत बंगल्याचं अनेकांना आकर्षण आहे. अनेक पर्यटक खास शाहरुखचा बंगला पाहण्यासाठी वांद्र्याला जातात.
4 / 10
शाहरुखच्या अफाट संपत्तीमध्ये त्याच्या घराचा मोठा वाटा असून आजच्या घडीला या बंगल्याची किंमत डोळे विस्फारतील एवढी आहे. म्हणूनच या बंगल्याची किंमत किती ते आज जाणून घेऊयात.
5 / 10
शाहरुखचा मन्नत हा बंगला वांद्रे येथे असून २७ हजार स्क्वेअर फूटच्या विस्तीर्ण जागेत तो उभा आहे.
6 / 10
२००१ साली शाहरुखने हा बंगला खरेदी केला आणि संपूर्ण कुटुंबासह येथे वास्तव्यास आला.
7 / 10
शाहरुखने हा बंगला खरेदी केला त्यावेळी त्याचं नाव विएना असं होतं. नरिमन दुबाश यांच्याकडून शाहरुखने तो १३. ३२ कोटींना विकत घेतला होता. विशेष म्हणजे या बंगल्याची सध्यस्थितीची किंमत गगनाला भिडली आहे.
8 / 10
शाहरुखचं बंगला त्याची पत्नी गौरी खान हिने डिझाइन केला आहे. ६ मजले असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक खोल्या, एक अवॉर्ड रुम, एक मुव्ही थिएटर, जीम आणि ,स्विमिंग पूल आहे.
9 / 10
शाहरुखच्या बंगल्याची नेमप्लेटचं केवळ २५ लाखांची आहे. यावरुन त्याच्या बंगल्याच्या किंमतीचा अंदाज लावता येतो.
10 / 10
या बंगल्याची आजच्या घडीला २०० कोटी रुपये इतकी किंमत आहे. विशेष म्हणजे केवळ मुंबईच नव्हे तर दिल्ली आणि लंडनमध्येही त्याची घरं आहेत.
टॅग्स :शाहरुख खानगौरी खानबॉलिवूडसेलिब्रिटी