Join us

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रिणीच्या पतीशी लग्न; फ्लॉप अभिनेत्री ते आता कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 6:57 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora) आठवतेय का? एक-दोन फ्लॉप चित्रपट केल्यानंतर ती सिनेमांपासून दूर झाली. आज अमृता 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. तसंच करिना कपूरच्या गर्ल गँगमध्ये ती कायम दिसते.
2 / 8
अमृता अरोराबद्दल अशा अनेक गोष्टी ज्या कायम चर्चेत राहिल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेटरशी अफेअर, मैत्रिणीच्या पतीशीच लग्न, आलिशान आयुष्य यामुळे अमृता कायम चर्चेत राहिली.
3 / 8
31 जानेवारी 1981 साली अमृताचा जन्म झाला. अमृता मलायकाची छोटी बहीण आहे. वयाच्या 22 व्या वर्षी तिने व्हिडिओ जॉकी म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
4 / 8
'कितने दूर कितने पास' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'एक और एक ग्यारह' सिनेमातही ती दिसली. मात्र एक अभिनेत्री म्हणून तिला फारसं यश मिळालं नाही.
5 / 8
प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अमृता वैयक्तिक कारणांमुळेच जास्त चर्चेत राहिली. पाकिस्तानात जन्मलेला इंग्लंड टीमचा क्रिकेटर उस्मान अफजलसोबत तिचं अफेअर चर्चेत होतं. 2004 साली उस्मान टीमसोबत भारत दौऱ्यावर आला होता. त्यांच्यात प्रेम जुळलं. मात्र 2006 साली त्यांचा ब्रेकअप झाला.
6 / 8
2008 साली तिने एका मुलाखतीत सांगितले की तिचं उस्मानवर प्रेम होतं.त्याच्यामुळेच क्रिकेट माझ्यासाठी दुसरं प्रेम बनलं असंही ती म्हणाली होती. त्यांचं रिलेशनशिप त्याकाळी चर्चेचा विषय होता.
7 / 8
2009 साली अमृताने उद्योगपती आणि कॉलेजमधील मित्र शकील लडकसोबत लग्न केले. यानंतर तिच्यावर मैत्रिणीचा संसार मोडल्याचा आरोप झाला. तिची मैत्रीण निशाने हा आरोप केला होता.
8 / 8
शकील आणि निशाचं आधी लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नानंतर शकील आणि अमृता यांच्यात जवळीक वाढली. नंतर शकीलने निशाला घटस्फोट दिला. निशाने नेहमीच अमृताला तिचं घर तोडण्यासाठी जबाबदार ठरवलं.
टॅग्स :अमृता अरोरामलायका अरोराबॉलिवूड