७ वर्षांच्या करिअरमध्ये सलग १३ फ्लॉप सिनेमे, पुढे बॉलिवूडला रामराम ठोकून अभिनेत्री संसारात रमली By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:26 PM1 / 7अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराला मात्र बॉलिवूडमध्ये हवं तितकं यश मिळालं नाही2 / 7अमृताला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. त्यामुळे तिने अभिनयाची वाट निवडली3 / 7२००२ साली रिलीज झालेल्या 'कितने दूर कितने पास' या सिनेमातून अमृताने अभिनय क्षेत्रातून पदार्पण केलं. या सिनेमात ती फरदीन खानची हिरोईन होती.4 / 7अमृताचा फरदीनसोबतचा पहिलाच सिनेमा सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळे अमृताच्या करिअरची सुरुवातच निराशाजनक झाली5 / 7पुढे मात्र अमृताला दुसऱ्या सिनेमात अक्षय कुमार, परेश रावल. जॉनी लिव्हर, सुनील शेट्टी या दिग्गज कलाकारांसोबत 'आवारा पागल दिवाना'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा काही प्रमाणात सुपरहिट झाला6 / 7त्यानंतर मात्र अमृताने ओळीने फ्लॉप सिनेमे दिले. ७ वर्षांच्या करिअरमध्ये अमृताच्या नावावर एकाही सुपरहिट सिनेमाची नोंद नाही. 7 / 7२००९ ला अमृताने बिझनेसमन शकील लडकसोबत लग्न केलं. लग्नानंतर मात्र अमृताने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. सध्या अमृता पती आणि मुलांसोबत आनंदाने संसार करत आहे२००९ ला अमृताने बिझनेसमन शकील लडकसोबत लग्न केलं. लग्नानंतर मात्र अमृताने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. सध्या अमृता पती आणि मुलांसोबत आनंदाने संसार करत आहे आणखी वाचा Subscribe to Notifications